Join us

‘चिनीं’ना हद्दपार करण्याचा आदेश हायकोर्टाकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 6:57 AM

व्हिसाचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन आॅफिसने (एफआरआरओ) ६० चिनींना देश सोडून जाण्याचा आदेश दिला होता.

मुंबई : व्हिसाचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन आॅफिसने (एफआरआरओ) ६० चिनींना देश सोडून जाण्याचा आदेश दिला होता. मात्र, उच्च न्यायालयाने शुक्रवारी हा आदेश रद्द करीत संबंधित कंपनीला दोन आठवड्यांत या ६० चिनींच्या भेटीबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.भारतात बिझनेस आणि टुरिस्ट व्हिसावर आलेले चिनी संबंधित कंपनीमध्ये मशीनवर काम करत होते. व्हिसाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला या महिन्याच्या सुरुवातीलाच नोटीस बजाविण्यात आली, असे एफआरआरओच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.त्यावर पॅसिफिक सायबर टेक्नॉलॉजी या कंपनीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, यातील काही लोक ग्राहकांचे प्रतिनिधी आहेत तर काही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर एक्सपर्ट आहेत आणि पुरवठादारांचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडे दीर्घकालीन व्हिसा आहे. मशीनवर कसे काम करावे, हे ते स्थानिक कर्मचाऱ्यांना दाखवत होते. ‘६० जणांना हद्दपार करण्याचा आदेश देण्यापूर्वी सरकारने कंपनीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावायला हवी होती. यामुळे एफआरआरओचा हा आदेश रद्द करत आहेत,’ असे म्हणत न्यायालयाने संबंधित कंपनीला दोन आठवड्यांत ६० चिनींच्या भेटीबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले.

टॅग्स :न्यायालय