शिवस्मारक कामाच्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:09 AM2020-03-17T05:09:50+5:302020-03-17T05:10:16+5:30
अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक प्रकरणी अनेक तक्रारी आल्या आहेतत्न कॅगने ताशेरे ओढले आहेतत्न त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.
अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. य्निविदा प्रक्रियेवर कॅगने गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.पर्यावरणासंदर्भात केंद्र शासनाकडून अनुमती मिळवताना विहित प्रक्रियेचे पालन झाले नसल्याच्या तक्रारी आहेत. स्मारक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात अजूनही शंका व्यक्त केल्या जात आहेत. यासंदर्भात विधिमंडळातही प्रश्न उपस्थित झाले. मात्र काही अधिकाऱ्यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली.