- अजय महाडीकमुंबई : नालासोपारा उमराळे येथील जैमुनी पतपेढीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा लेखापरीक्षण अहवाल वसई उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाला आहे. यातून पतपेढीत अनियमितता असल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्या चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पालघर जिल्हा उपनिबंधक (ए.आर.) यांच्याकडून ही चौकशी केली जाणार असून, दोन दिवसांपूर्वीच हे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती वसई उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.नालासोपारा-उमराळे येथील सामवेदी बाह्मण समाजाच्या जैमुनी या पतपेढीतून बोगस फ्लॅटधारकांच्या नावे मेसर्स साई एम्पायरचे बांधकाम व्यावसायिक अविनाश ढोले यांना कोट्यवधी रु पयांचे कर्ज देण्यात आले होते. या कर्जवाटप गैरव्यवहारात संचालक मंडळाचाही सहभाग होता. जैमुनीच्या संचालक मंडळाने सर्च रिपोर्ट सादर न करताच हे कर्जवाटप केले होते.तक्र ारदारांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जैमुनी पतपेढीचे बिंग अखेर फुटलेच. परिणामी पोलिसांनीही या प्रकरणी मेसर्स साई एम्पायरचे अविनाश ढोले आणि जैमुनी पतपेढीतील संचालक मंडळाविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. तर वसई उपनिबंधक कार्यालय जैमुनी पतपेढीच्या लेखापरीक्षण अहवालाच्या प्रतीक्षेत होते. सरतेशेवटी वसई उपनिबंधक कार्यालयाला हा लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाला असून त्यात जैमुनी पतपेढीतील गैरव्यवहार समोर आल्याने उपनिबंधक कार्यालयाकडून पतपेढीच्या चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अधिक वृत्त पान ५ वर>कोट्यवधीची बोगसगिरीया कर्जवाटपासाठी तब्बल शेकडो फ्लॅटधारकांच्या जागी बोगस ग्राहक उभे करण्यात आले होते. त्यांच्या नावे गहाण खत करून कोट्यवधी रु पयांचे कर्ज साई एम्पायरचे अविनाश ढोले यांना देण्यात आले होते.काही फ्लॅटधारकांच्या आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस आणि उपनिबंधक कार्यालयात धाव घेऊन याबाबत तक्र ार केली होती.
जैमुनी पतपेढीच्या चौकशीचे आदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:28 AM