आयुष मंत्रालयाचा आदेश : कोरोना योध्दांना ‘रोगप्रतिकारक शक्ती’ च्या औषधांचा डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 03:59 PM2020-05-14T15:59:50+5:302020-05-14T16:00:56+5:30
पोलीस, पोलीस हवालदार आणि पेट्रोल पंपावर काम करत असलेल्या कर्मचा-यांना मोफत होमिओपॅथी औषध दिली जात आहेत.
मुंबई : कोरोना विरोधातील लढयात सहभागी होत असलेल्या योध्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून ठिकठिकाणी काम केले जात असून, पोलीस, पोलीस हवालदार आणि पेट्रोल पंपावर काम करत असलेल्या कर्मचा-यांना मोफत होमिओपॅथी औषध दिली जात आहेत. शिवाय तापमानदेखील तपासले जात असून, त्यांच्या कामाच कौतुक देखील केले जात आहे. विशेषत: हे काम आयुष मंत्रालयाच्या आदेशानुसार सुरु आहे, अशी माहिती डॉ. सुप्रिया गजरे-बागुल यांनी दिली.
आयुष मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करत असलेल्या डॉ. सुप्रिया गजरे-बागुल यांनी सांगितले की आम्ही पोलीसांसाठी काम करत आहोत. विशेषत: कोरोनाविरोधातील लढयात योगदान देत असलेल्या प्रत्येकाला आम्ही मदत करत आहोत. विशेषत: पोलीसांना मोफत होमिओपॅथी औषध देत आहोत. वाहतूक पोलीसांना औषध देत आहोत. त्यांच्या कुटूंबांना पण औषध देत आहोत. पेट्रोल पंपावर काम करत असलेल्या कर्मचारी वर्गास औषध दिली आहेत. या औषधांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आतापर्यंत ३५० औषधांच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले आहे. एका बॉटलमध्ये तीन ते चार लोक औषध घेऊ शकतात. लोकांचे तापमानदेखील तपासले जात आहे.
---------------------------------
- बेस्टच्या वीज विभागाचे कामगार देखील जीवावर उदार होत काम करत आहोत. सेंट जॉर्ज रुग्णालयात लाईफ सेव्हिंग इक्युपेमेंटसाठी वेगळ्या मीटर केबिनची गरज होती. परिणामी दोन क्रॉम्प्रेसर वापरून कठीण अशी जमीन फोडून ७० मीटर खोदकाम करण्यात आले. एका दिवसांत ७० मीटर केबल जमिनीत खोदकाम करून टाकण्यात आली. शिवाय केबिनमध्ये विद्युत पुरवठा आणण्यात आला.
- पीपई किट घालून कामगारांनी न खाता पिता सलग ५ तास काम केले. ऊन्हात पीपीई किट घालून काम करणे किती जिकरीचे आहे? याचा अनुभव कामगारांना येत होता. यावर येथील डॉक्टरांनी बाहेर येत कामगारांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. शिवाय त्यांच्यावर टाळ्यांचा वर्षाव केला. कारण हे काम खुप कठीण होते. काम करताना वारंवार हातमोजे फाटत होते. यावेळी इनचार्ज डेप्युटी इंजिनिअर अस्लम काझी आणि चार्ज इंजिनिअर गजगे उपस्थित होते.
---------------------------------
- कोरोनाविरोधात लढत असलेल्या प्रत्येकाला श्रीकृष्ण क्रिडा मंडळाने सलाम केला आहे.
- एल विभागातील जनतेला सोशल मीडियाद्वारे सुरक्षेचे उपाय याबाबत सुचना इत्यादी उपक्रम सुरु आहेत.
- मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुर्ला, बीकेसी येथील मुख्य रस्त्यावर जनजागृती करीता चित्राद्वारे संदेश दिले जात आहेत.