मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे मुंबईत स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या समितीच्या कार्यालयात केलेली नियमबाह्य भरती रद्द करण्याचे आदेश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. अशी नियमबाह्य भरती केली जात असल्याचे वृत्त लोकमतने दिले होते.या समितीचे उपाध्यक्ष व सदस्य सचिव असलेले मधुकर कांबळे यांना बडोले यांनी पत्र दिले आहे. आपण शासकीय कर्मचाºयांच्या धर्तीवर परस्पर कर्मचाºयांच्या नेमणुका करून त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून आधारसंलग्न ओळखपत्र देत आहात. ही कृती नियमबाह्य आहे. संबंधित कर्मचाºयांना तातडीने कार्यमुक्त करावे अन्यथा शासनाला कार्यवाही करावी लागेल, असे बडोले यांनी बजावले.>या निमित्ताने भाजपाच्या दोन नेत्यांमधील संघर्ष समोर आला आहे. बडोले एकीकडे कांबळेंविरुद्ध कारवाई करायला निघाले असताना त्यांच्याच सामाजिक न्याय विभागातील वरिष्ठ अधिकाºयांचे कांबळे यांना सहकार्य आहे. स्मारक उभारणीबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नसताना मोठे कार्यालय समितीने सरकारी खर्चाने थाटले आहे.
अण्णाभाऊ समितीतील ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:14 AM