‘त्या’ शाळेची शुल्कवाढ अवैध, वाढीव शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:19 AM2018-01-25T02:19:44+5:302018-01-25T02:20:03+5:30

गेल्या काही वर्षांत काही शाळांचा मनमानी कारभार खुलेआमपणे सुरू आहे. नियमात बसत नसतानाही शुल्कवाढ केली जाते. माहीमच्या सरस्वती मंदिर शाळेनेही यंदा मनमानी कारभार करत, तब्बल २५ टक्के शुल्कवाढ केली होती; पण जिल्हाधिकारी कार्यालयाने ही शुल्कवाढ अवैध ठरवली असून, शाळेला वाढीव घेतलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 Order to return 'those' school fees to invalid, increased fees | ‘त्या’ शाळेची शुल्कवाढ अवैध, वाढीव शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश

‘त्या’ शाळेची शुल्कवाढ अवैध, वाढीव शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश

Next

मुंबई : गेल्या काही वर्षांत काही शाळांचा मनमानी कारभार खुलेआमपणे सुरू आहे. नियमात बसत नसतानाही शुल्कवाढ केली जाते. माहीमच्या सरस्वती मंदिर शाळेनेही यंदा मनमानी कारभार करत, तब्बल २५ टक्के शुल्कवाढ केली होती; पण जिल्हाधिकारी कार्यालयाने ही शुल्कवाढ अवैध ठरवली असून, शाळेला वाढीव घेतलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शाळेतील काही पालकांनी वाढीव शुल्क भरलेले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना याची शिक्षा केली जात होती. विद्यार्थ्यांना तासन्तास वर्गाबाहेर उभे केले जायचे. विद्यार्थ्यांना दुसºया वर्गात बसवले जात होते, तर दोन विद्यार्थ्यांना शाळेतून बडतर्फही करण्यात आल्याची घटना शाळेत घडली होती. यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी एकत्र येऊन तक्रार नोंदवण्याचे पाऊल उचलले.
नितीन वाघमारे आणि मकरंद काणे या दोन पालकांनी राज्य बालहक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत आयोगाने शिक्षण उपसंचालक कार्यालयाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ही प्रक्रिया सुरू असताना वाघमारे यांनी राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे धाव घेतली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय बालहक्क आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सरस्वती मंदिर शाळेबाबत अहवाल मागवला होता.
शाळेने अवैधरीत्या शुल्क आकारणी केली असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या शिक्षेविरुद्ध शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याच्या सूचना शाळेला दिल्या आहेत; पण याबाबत शाळेकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे कारवाई केल्यासंदर्भात पत्र आलेले नाही.
विद्यार्थ्यांना केली जायची शिक्षा-
वाढीव शुल्क भरले नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा केली जायची. तासन्तास वर्गाबाहेर उभे केले जायचे. विद्यार्थ्यांना दुसºया वर्गात बसवले जात होते, तर दोन विद्यार्थ्यांना शाळेतून बडतर्फही करण्यात आल्याची घटना शाळेत घडली होती. यानंतर संतप्त पालकांनी एकत्र येऊन तक्रार केली हेती.

Web Title:  Order to return 'those' school fees to invalid, increased fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.