आमदार रमेश कदमांची 135 कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

By admin | Published: March 10, 2017 06:52 PM2017-03-10T18:52:21+5:302017-03-10T18:52:21+5:30

अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.

The order for the seizure of assets worth Rs 135 crores by MLA Ramesh Kadam has been seized | आमदार रमेश कदमांची 135 कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

आमदार रमेश कदमांची 135 कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. रमेश कदम यांची 135 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने दिले आहे. सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे अन्वेषण विभाग रमेश कदम यांची एकूण 135 कोटी 16 लाख 82 हजार 608 रुपयांची मालमत्ता जप्त करणार आहे. यात शेती, प्लॉट, कपेडर रोड येथील प्लॉट, औरंगाबाद इथली मालमत्ता आणि 20-25 बँक अकाऊंट, अशा एकूण 54 मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायमूर्ती टंकीवाला यांनी दिले आहेत. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी आमदार रमेश कदम सध्या अटकेत असून, त्यांनी 400 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचे म्हटलं जात आहे. पुणे-नगर रस्त्यावरील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमधून सीआयडीच्या पथकाने त्यांना अटक केली.
 
काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा ?
अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपत सह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्या बाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला आहे.
 
कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती
उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं .नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले. 
अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या 
लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले
महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्र वाटण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप
 

Web Title: The order for the seizure of assets worth Rs 135 crores by MLA Ramesh Kadam has been seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.