जेवण ऑर्डर करत आहात? सावधान! , सायबर पोलिसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 06:30 AM2020-05-20T06:30:21+5:302020-05-20T06:32:29+5:30
लॉकडाउनच्या काळात नागरिकांची गरज पाहून आॅनलाइन भामटे सक्रिय होत आहेत. बँक, सरकारी संकेतस्थळ, तसेच विविध ग्राहक सेवा क्रमांकाच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना होत आहेत.
मुंबई : लॉकडाउनच्या काळात नागरिक गरज म्हणून तर काही जण जिभेचे चोचले पुरविण्यासाठी रेस्टारंट, हॉटेलमध्ये आॅनलाइन जेवणाची आॅर्डर देत आहेत. मात्र हीच आॅर्डर त्यांना भलतीच महागात पडत असल्याचे चित्र सध्या राज्यभरात पाहावयास मिळत आहे. सायबर भामट्यांनी बनावट संकेतस्थळ बनवून नागरिकांची फसवणूक सुरू केल्याच्या तक्रारी डोके वर काढत असल्याने सायबर पोलिसांनी नागरिकांना आॅनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
लॉकडाउनच्या काळात नागरिकांची गरज पाहून आॅनलाइन भामटे सक्रिय होत आहेत. बँक, सरकारी संकेतस्थळ, तसेच विविध ग्राहक सेवा क्रमांकाच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना होत आहेत. त्यात सध्या लॉकडाउनच्या काळात काही रेस्टॉरंट्स व उपाहारगृह आॅनलाइन आॅर्डर घेत आहेत व त्याचे बिल आॅनलाइन भरण्यास सांगत आहेत. मात्र अशा आॅनलाइन आॅर्डर देत असताना आपण सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलीस करत आहेत.
सायबर भामटे मोठ्या व प्रसिद्ध रेस्टॉरंट्सच्या नावाच्या फेक वेबसाइट बनवून लोकांना लुबाडत आहेत. त्यामुळे आपण आॅनलाइन आॅर्डर करताना सदर रेस्टॉरंट /उपाहारगृह यांच्या वेबसाइट अधिकृत आहेत याची खात्री करूनच आॅर्डर द्या. आॅर्डर देत असताना जर कोणती वेबसाइट तुमचे डेबिट /क्रेडिट कार्ड पिन नंबर मागत असेल तर देऊ नका. जर तुम्ही अशा फेक वेबसाइटवर फसविले गेले असाल तर त्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये अथवा तसेच ६६६.ू८ुी१ू१्रेी.ॅङ्म५.्रल्ल पण नोंदवा, असे महाराष्ट्र सायबर पोलीस अधीक्षक बलसिंग राजपूत यांनी सांगितले आहे. लॉकडाउनबाबत राज्य व केंद्र सरकार अधिकृतरीत्या जी माहिती व नियमावली वेळोवेळी प्रसिद्ध करतील त्यावरच विश्वास ठेवा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन राजपूत यांनी केले आहे.
आॅनलाइन मद्यविक्रीतही फसवणूक
आॅनलाइन मद्य आॅर्डर करणाऱ्यांना अशा प्रकारे फटका बसत आहे. त्यामुळे आॅनलाइन व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे.