ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:04 AM2021-01-01T04:04:37+5:302021-01-01T04:04:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पत्नी घरी नसल्याने ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे एका व्यावसायिकाला महागात पडले. त्यांच्यावर १५ हजार ...

Ordering meals online is expensive | ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे पडले महागात

ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे पडले महागात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पत्नी घरी नसल्याने ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे एका व्यावसायिकाला महागात पडले. त्यांच्यावर १५ हजार रुपये गमाविण्याची वेळ आली. या प्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

चिराबाजार परिसरात राहणारे ४० वर्षीय तक्रारदार खासगी फायनान्स एजन्सी चालवितात. वैयक्तिक कारणास्तव बाहेर जावे लागल्याने पतीची गैरसाेय हाेऊ नये म्हणून त्यांच्या पत्नीने गुगलवरून जवळच्या हॉटेलचा संपर्क क्रमांक शोधून हॉटेलमधून जेवण ऑर्डर केले. पेमेंटसाठी पतीचा मोबाईल क्रमांक दिला. त्यानुसार तक्रारदार यांना हॉटेलमधून बोलत असल्याचे सांगून एक लिंक पाठविण्यात आली आणि त्यावर १० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यांनी लिंकवर पैसे पाठवताच त्यानंतरच्या दोन व्यवहारांत त्यांच्या खात्यातून तब्बल १४ हजार ९९९ रुपये वजा झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बुधवारी एल. टी. मार्ग पोलिसांत धाव घेतली.

...............................

Web Title: Ordering meals online is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.