Join us

ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पत्नी घरी नसल्याने ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे एका व्यावसायिकाला महागात पडले. त्यांच्यावर १५ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पत्नी घरी नसल्याने ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे एका व्यावसायिकाला महागात पडले. त्यांच्यावर १५ हजार रुपये गमाविण्याची वेळ आली. या प्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

चिराबाजार परिसरात राहणारे ४० वर्षीय तक्रारदार खासगी फायनान्स एजन्सी चालवितात. वैयक्तिक कारणास्तव बाहेर जावे लागल्याने पतीची गैरसाेय हाेऊ नये म्हणून त्यांच्या पत्नीने गुगलवरून जवळच्या हॉटेलचा संपर्क क्रमांक शोधून हॉटेलमधून जेवण ऑर्डर केले. पेमेंटसाठी पतीचा मोबाईल क्रमांक दिला. त्यानुसार तक्रारदार यांना हॉटेलमधून बोलत असल्याचे सांगून एक लिंक पाठविण्यात आली आणि त्यावर १० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यांनी लिंकवर पैसे पाठवताच त्यानंतरच्या दोन व्यवहारांत त्यांच्या खात्यातून तब्बल १४ हजार ९९९ रुपये वजा झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बुधवारी एल. टी. मार्ग पोलिसांत धाव घेतली.

...............................