६६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान; यकृत दान करून रुग्णाला दिले जीवनदान 

By संतोष आंधळे | Published: March 24, 2024 11:22 AM2024-03-24T11:22:32+5:302024-03-24T11:22:59+5:30

हे मुंबई शहरातील या वर्षातील ८ वे अवयव दान आहे.

organ donation of 66 year old senior citizen giving life to a patient by donating a liver | ६६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान; यकृत दान करून रुग्णाला दिले जीवनदान 

६६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान; यकृत दान करून रुग्णाला दिले जीवनदान 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विलेपार्ले येथील नानावटी मॅक्स रुग्णालयात शनिवारी ६६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एका रुग्णाला  जीवनदान मिळाले आहे. या अवयवदानातून यकृत आणि डोळे दान केले गेले. हे मुंबई शहरातील या वर्षातील ८ वे अवयव दान आहे.

राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.

Web Title: organ donation of 66 year old senior citizen giving life to a patient by donating a liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.