पदवीधर निवडणुकीसाठी संघटनांची ‘फिल्डिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:51 AM2018-03-01T02:51:19+5:302018-03-01T02:51:19+5:30

विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुक उमेदवारांना ८ मार्चपर्यंत अर्ज करण्यास मुदत आहे.

 Organizations 'Fielding' for Graduate Elections | पदवीधर निवडणुकीसाठी संघटनांची ‘फिल्डिंग’

पदवीधर निवडणुकीसाठी संघटनांची ‘फिल्डिंग’

Next

मुंबई : विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुक उमेदवारांना ८ मार्चपर्यंत अर्ज करण्यास मुदत आहे. या निवडणुकीचे मतदान २५ मार्च रोजी होणार असून २७ मार्च रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे संघटनांनी आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
यासंदर्भात अधिसूचनेत जाहीर केलेल्या माहितीनुसार, निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ८ मार्चपर्यंत अर्ज करता येतील, त्यानंतर ९ मार्चला अर्जांची छाननी करता येईल. या उमेदवारी नामनिर्देशन अर्जांच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे अपील करण्याची संधी मिळेल. १२ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची सवलत देण्यात आली आहे. याउलट १४ मार्च रोजी पात्र उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली जाईल, तर २५ मार्चला निवडणूक पार पडणार असून पात्र मतदारांना मतदान करता येईल. २७ रोजी मतमोजणीद्वारे निवडणुकीतील विजेत्यांची घोषणा केली जाईल.
दरम्यान, या निवडणुकीसाठी विद्यार्थी संघटनांसह राजकीय पक्षांनीही कंबर कसल्याचे दिसत आहे. प्रचाराचा नारळ आधीच फुटला असून सिनेटमध्ये संख्याबळ वाढवण्यासाठी सर्वच संघटनांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, प्रत्येक संघटनेकडून कोण-कोण अर्ज करणार याची उत्सुकता तूर्तास शिगेला पोहोचलेली आहे.
१० जागांसाठी निवडणूक
मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली असून एकूण १० जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यातील ५ जागा राखीव प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव प्रवर्गात प्रामुख्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती, इतर मागास वर्ग, महिला प्रवर्गाचा समावेश आहे.

Web Title:  Organizations 'Fielding' for Graduate Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.