मुंबई : दारूच्या विक्रीत विक्रमी वाढ असून महसुलात २५ टक्के वाढ झाल्याने सरकारने मद्यविक्रीतून घसघशीत कमाई केली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. मात्र, मुंबईतून महसूल कमी गोळा झाल्याने व्यसनमुक्तीवर काम करणाऱ्या संघटनांनी समाधान व्यक्त केले असून व्यसनाच्या जनजागृतीमुळे दारूकडे मुंबईकरांनी पाठ फिरविली असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, नशाबंदी मंडळाचे मुख्य संघटक अमोल स.भा. मडामे यांनी सांगितले की, नशाबंदी मंडळ मुंबईत व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करीत असते. कोरोना साथ आणि लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने ग्रामीण भागात व्यसनाचे प्रमाण वाढल्याचे ते म्हणाले.
किमतीत वाढ होऊनही गेल्या अनेक वर्षांत ही सर्वांत मोठी वार्षिक वाढ आहे. त्यामुळे महसुलात जवळपास २५ टक्के वाढ आहे.
Jayant Patil: जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; सोमवारी हजर राहण्याचे आदेश, राजकीय चर्चांना उधाण
जिथून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा व्हायचा त्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या विभागापेक्षा नागपूर, औरंगाबाद कोल्हापूर विभागातील ही वाढ जास्त आहे. मुंबई अबकारी महसुलात केवळ २३ टक्के वार्षिक वाढ दिसून आली आहे.