‘समृद्धी’वर फॉर्म्युला रेस आयोजित करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आयोजकांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 07:10 AM2023-01-14T07:10:09+5:302023-01-14T07:10:19+5:30

तेलंगणामधील हैदराबाद येथे ११ फेब्रुवारीला फॉर्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप कार रेस पार पाडणार आहे.  

Organize Formula Races on Samruddhi Mahamarg; Chief Minister Eknath Shinde's invitation to the organizers | ‘समृद्धी’वर फॉर्म्युला रेस आयोजित करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आयोजकांना निमंत्रण

‘समृद्धी’वर फॉर्म्युला रेस आयोजित करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आयोजकांना निमंत्रण

Next

मुंबई : फॉर्म्युला रेस महाराष्ट्रातही व्हावी अशी अपेक्षा असून त्यासाठी इथे रस्त्यांचे उत्तम जाळे आहे. नुकताच आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खुला केला आहे. हा महामार्ग या रेससाठी उत्तम ठरेल असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही रेस समृद्धी महामार्गावर आयोजित करण्यासाठी आयोजकांना जाहीर निमंत्रण दिले.  

भारतात पहिल्यांदाच आयोजित केल्या जाणाऱ्या फॉर्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप या ई व्हेईकल्सच्या कार रेसमधील कारचे मुख्यमंत्री शिंदे आणि  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात अनावरण करण्यात आले. तेलंगणामधील हैदराबाद येथे ११ फेब्रुवारीला फॉर्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप कार रेस पार पाडणार आहे.  

Web Title: Organize Formula Races on Samruddhi Mahamarg; Chief Minister Eknath Shinde's invitation to the organizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.