गुंतवणूकदार होण्यासाठी ‘शेअर बाजार २०१७’चे आयोजन

By admin | Published: January 23, 2017 06:05 AM2017-01-23T06:05:58+5:302017-01-23T06:05:58+5:30

चांगला गुंतवणूकदार होण्याचे प्रशिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. हेच ओळखून या अनुषंगाने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या

Organize 'Share Market 2017' to become an investor | गुंतवणूकदार होण्यासाठी ‘शेअर बाजार २०१७’चे आयोजन

गुंतवणूकदार होण्यासाठी ‘शेअर बाजार २०१७’चे आयोजन

Next

मुंबई : चांगला गुंतवणूकदार होण्याचे प्रशिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. हेच ओळखून या अनुषंगाने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथे आंतरमहाविद्यालयीन तीन दिवसीय ‘शेअर बाजार २०१७’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुंबईमध्ये लाइव्ह ट्रेडिंग प्रकारात होणाऱ्या या
एकमेव स्पर्धेचा ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.
ही स्पर्धा २३ ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे. युवकांना स्टॉक एक्सचेंजमधील आॅनलाइन ट्रेडिंगचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी विद्यार्थ्यांना शेअर बाजारामधील व्यवहारांची जाण व्हावी हा या स्पर्धेचा मूळ हेतू आहे. युवकांनी कॅपिटल मार्केटमध्ये कमीतकमी वेळेत अधिकाधिक नफा कसा कमवावा याचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून केले जाईल. विद्यार्थ्यांना दोन जणांच्या टीममध्ये भाग घ्यावा लागेल. (प्रतिनिधी)

Web Title: Organize 'Share Market 2017' to become an investor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.