Join us  

सांताक्रूझ येथे पुस्तक प्रदर्शन सोहळा आणि डिजिटल जनजागृती मोहिमचे आयोजन

By मनोहर कुंभेजकर | Published: April 30, 2023 1:27 PM

 या पुस्तक प्रदर्शनात १०% सवलतीच्या दरात पुस्तक विक्री होणार असून  मतदान ओळखपत्र असल्यास प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडून ५% अधिकची सवलत मिळणार आहे.

मुंबई-प्रबोधन शिक्षण संस्था संचालित सांताक्रूझ (पूर्व), राजे संभाजी विद्यालय आणि सदामंगल बुक डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ एप्रिल  ते सोमवार, दि १ मे या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत येथील राजे संभाजी विद्यालय, पटेल नगर येथे पुस्तक प्रदर्शन सोहळा आणि डिजिटल जनजागृती मोहीम" आयोजित करण्यात आली आहे. मुंबईचे माजी महापौर, माजी नगरसेवक, प्रबोधन शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या वतीने सदर कार्यक्रम आयोजित केला आहे.

सदर पुस्तक प्रदर्शन  आणि डिजिटल जनजागृती मोहिमेचा उद्घाटन सोहळा विधानपरिषद गटनेते, प्रवक्ते, विभागप्रमुख, आमदार डॉ. अनिल परब  यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे सचिव  संदीप चव्हाण, प्रकाशक प्रज्ञा जांभेकर, कार्यक्रमाचे आयोजक  प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर , प्रबोधन शिक्षण संस्थेच्या कार्यवाह, माजी नगरसेविका  पूजा महाडेश्वर, विधानसभा संघटक सुभाष कांता सावंत, शाखाप्रमुख  संतोष गुप्ता, संदीप शिवलकर, संतोष कदम, महिला शाखासंघटक अंजली जाधव,  युवतीसेना समन्वयक डॉ. प्रांजल महाडेश्वर, मुख्याध्यापक सुहास ठाकूर, मुख्याध्यापिका  निता शिंदे  आदी मान्यवर उपस्थित होते.

 या पुस्तक प्रदर्शनात १०% सवलतीच्या दरात पुस्तक विक्री होणार असून  मतदान ओळखपत्र असल्यास प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडून ५% अधिकची सवलत मिळणार आहे. तसेच डिजिटल जनजागृती मोहीम अंतर्गत मतदान ओळखपत्र पॅन कार्डला लिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी मयेकर यांनी केले.

टॅग्स :मुंबई