आरेच्या आदिवासी पाडयात रंगला खेळ होम मिनिस्टरचा
By मनोहर कुंभेजकर | Published: February 6, 2024 05:17 PM2024-02-06T17:17:46+5:302024-02-06T17:18:45+5:30
१७० महिलांना हळदी कुंकूत सॅनिटरी पॅडचे वाटप.
मनोहर कुंभेजकर, मुंबई : गोरेगाव पूर्व येथील आरे मधील खडकपाडा येथे दरवर्षीप्रमाणे आदिवासी पाड्यात हळदी कुंकाचा कार्यक्रम अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत आयोजित केला जातो. मात्र यावर्षी संस्थेमार्फत हळदीकुंकू सोबतच होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित होम मिनिस्टर सतीश भोंडवे यांनी घेतला.
त्या कार्यक्रमांमध्ये महिलांना अनेक खेळ खेळले. महिलांना होम मिनिस्टर काय असते याचे कुतूहल होते.आदिवासी महिला अगदी आनंदाने होम मिनिस्टर चे खेळ खेळल्या. या खेळात अनेक महिलांनी सहभाग घेतला आणि एक दोन तीन क्रमांकाचे बक्षीसेही पटकवली.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी वाणा बरोबर आदिवासी महिलांना सॅनिटरी पॅड सह तब्बल 170 महिलांना हळदी कुंकू वाण देण्यात आले. हा अनोखा उपक्रम ही संस्था नेहमीच राबवत असून हळदी कुंकू बरोबर आपल्या आरोग्य विषयी कशी काळजी घेतली पाहिजे या संदर्भात सुद्धा माहिती दिली अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष सुनीता नागरे यांनी दिली.
या हळदी कुंकू समारंभाला माजी नगरसेविका प्रीती सातम ठाकूर कॉलेजच्या प्रोफेसर डॉ. संगीता व्हटकर त् भाजप वसई जिल्हा सचिव कवितात खेडकर, झुल्लर यादव, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रीती सातम यांनी सांगितले की, हळदी कुंकू हा सुहासिनीचा सण असतो,पण वाण म्हणून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येत्ते हा एक या संस्थेचा स्तुत्य उपक्रम आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक महिलाही सक्षम झाली पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रातील अदिवासी भागात सुनीता नागरे करत असलेल्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.सुरज विश्वकर्मा, वनिता मराठे, ऋतुजा नागरे प्रसाद मराठे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने होम मिनिस्टर खेळ येथील आदिवासी महिलांसाठी आयोजित केला नव्हता. तो या संस्थेने आयोजित केल्याबद्धल या परिसरातील आदिवासी पाड्यातील महिलांनी संस्थेचे आभार मानले.