Join us

वसईत विजयोत्सवाचे २ मे पासून आयोजन

By admin | Published: April 21, 2015 10:48 PM

वसई-विरार शहर महानगरपालिका व वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी होणारा वसई विजयोत्सव यंदा २ ते ४ मे दरम्यान आयोजित

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका व वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी होणारा वसई विजयोत्सव यंदा २ ते ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची रुपरेषा ठरवण्यासाठी वसई येथे पालिका सभागृहात बैठक झाली. या बैठकीस महापौर नारायण मानकर व माजी महापौर राजीव पाटील आदी उपस्थित होते.यंदाच्या महोत्सवामध्ये नरवीर चिमाजी आप्पा यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा हा विजयोत्सव वसईच्या किल्ल्यात धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. २ मे रोजी उद्घाटन सोहळा, किल्लेप्रदर्शन, बालमहोत्सव, खाद्यजत्रा त्यानंतर दुसऱ्या दिवशी किल्लासफर, सायंकाळी ७ वा. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या मी मराठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, त्यानंतर ४ मे रोजी वसई अ‍ॅडव्हेंचर्स क्लबतर्फे मोटर सायकल रॅली, सायंकाळी बालकलाकारांचा नृत्याविष्कार सादर होणार आहे. यावेळी किल्ले बांधणी प्रदर्शन ठेवण्यात आले असून मुंबई व ठाण्यातील नामवंत कलावंत या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६.३० वा. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याहस्ते स्मारकाचे पूजन होणार आहे. (प्रतिनिधी)