मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगरात स्टडी सर्कलचे आयोजन
By मनोहर कुंभेजकर | Published: May 23, 2024 09:22 PM2024-05-23T21:22:26+5:302024-05-23T21:22:42+5:30
मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर मध्ये स्टडी सर्कलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मुंबई-दिशा ज्योत फाउंडेशन अंतर्गत अंतर्गत युथ संघटक उभारून जसे स्टडी सर्कल गोवंडी, मानखुर्द चेंबूर, घाटकोपर, कल्याण, ठाणे, सायन आणि वडाळा आदी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये स्टडी सर्कल चालते. आज भगवान गौतम बुद्ध पौ्णिमा देखील युथ संघटन वतीने सांस्कृतिक पद्धतीने मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर मध्ये स्टडी सर्कलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
गेले चार वर्षापासून आमचे हे स्टडी सर्कल मुंबईच्या वेगवेगळ्या वस्त्यामध्ये आहे. युवकांना एकत्र करून स्टडी सर्कलच्या माध्यमातून थोर समाज सुधारक यांच्या पुस्तकांचे वाचन केले जाते.दर आठवड्यात शनिवारी प्रत्येकी युवकांनी केलेल्या पुस्तकाचे वाचनाची सर्वांसोबत बैठक करून व्यक्तीश पुस्तकाचे प्रेझेंटेशन दिले जाते. त्यामुळे उपस्थित असलेल्या सर्व युवकांपैकी 15 ते 20 पुस्तकांचे ज्ञान ३ तासात मिळते. तसेच स्टडी सर्कल हे वर्षभरात थोर समाज सुधारक यांच्या जयंती पुण्यतिथी व इतर विशेष दिन साजरा करतात अशी माहिती दिशा ज्योत फाउंडेशन संस्थापिका ज्योती साठे यांनी दिली.
इतर विशेष दिनाविषयी निमित्त एकत्रित येऊन मुंबईच्या वस्त्यांमध्ये कार्यक्रम साजरे करतात. कार्यक्रमाद्वारे महामानव थोर समाज सुधारक यांच्या केलेल्या कामगिरीचा माहिती देऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आणि गेले चार वर्षापासून करत आहे. हे कार्य करण्याचे आतपर्यंत आमचे मुख्य उद्देश आहे समाजामध्ये आधुनिक काळाला महापुरुषांचे कमिगिरी कळावी व इतिहास माहिती असावा
हा यामागचा उद्देश असून त्यामुळे ऐतिहासिक वारसा पुढे चालवत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
ज्योती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक आकाश साठे, सदस्य - सनी साबळे, प्रियांका गवारे, शीतल थोरात, सिद्धार्थ गडविर, आशिष घुले, गणेश चव्हाण, व प्रमुख अतिथी दिशा ज्योत महिला मंडळ अध्यक्ष - सुनिता नामदेव साठे आणि महिला मंडळ परिवार, गीता गुप्ता, छाया साठे या उपक्रमात मोलाचे सहकार्य करतात.