Join us

गोविंदा मृत्यूप्रकरणी आयोजकाला अटक; पुरेशी सुरक्षाव्यवस्था न दिल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 5:58 AM

कुर्ल्यातील रहिवासी असलेला संदेश दळवी पार्ल्यातील शिवशंभो गोविंदा पथकाचा सदस्य होता.

मुंबई :

दहीहंडीच्या सातव्या थरावरून पडून संदेश दळवी या गोविंदाचा मृत्यू झाल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दहीहंडी उत्सवाचा आयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष रियाझ शेख (३६) याला अटक केली. दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदा पथकाला पुरेशी सुरक्षाव्यवस्था न दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. 

कुर्ल्यातील रहिवासी असलेला संदेश दळवी पार्ल्यातील शिवशंभो गोविंदा पथकाचा सदस्य होता. पार्ल्यात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात त्याचा सातव्या थरावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. दहीहंडी उत्सवाचा आयोजक शेख याने दहीहंडी फोडण्यासाठीचे मनोरे रचणाऱ्या गोविंदांना कोणतीही सुरक्षाव्यवस्था दिली नव्हती.  त्यामुळे शेखवर सुरुवातीला मानवी जीवन धोक्यात आणल्याबद्दल भारतीय दंड विधान संहितेचे कलम ३३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संदेश दळवीच्या मृत्यूनंतर ३०४ (अ) मध्ये त्याचे रूपांतर करण्यात आले. शेखच्या अटकेबाबत बोलताना विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नार्वेकर म्हणाले, की ‘शेखने सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे दळवी यांचा मृत्यू झाला तर दुसरा अद्याप कूपर रुग्णालयात दाखल आहे.

टॅग्स :दहीहंडी