गोरेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:06 AM2021-05-14T04:06:09+5:302021-05-14T04:06:09+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गोरेगाव नागरी निवारा परिषदेत रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार १४ मे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गोरेगाव नागरी निवारा परिषदेत रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार १४ मे रोजी करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत नागरी निवारा सांस्कृतिक केंद्र, नागरी निवारा परिषद झोन ४, संकल्प सहनिवास, गोरेगाव पूर्व येथे हे शिबिर हाेईल.
१८ ते ४५ वयोगटातील युवावर्गाने लसीकरणाआधी रक्तदान करण्याचे आवाहन साद प्रतिसादचे संदीप सावंत यांनी केले आहे. ज्या नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे त्यांची प्लाझ्मा तपासणीसोबत विभागातील नागरिकांची रक्तगट सूचीही तयार करण्यात येणार आहे.
या रक्तदान शिबिरास साद प्रतिसाद, नागरी निवारा वसाहत गृहनिर्माण संस्था फेडरेशन, सकल मराठा समाज गोरेगाव, नागरी सेवा संस्था, दिंडोशी पोलीस ठाणे, हिमालया नागरी सेवा संस्था, लोकशाही कट्टा, नगरराज बिल अभियान तसेच विभागातील गृहनिर्माण संस्था व सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
-------------------------------------------------