गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2016 03:50 AM2016-09-08T03:50:43+5:302016-09-08T03:50:43+5:30
गणेशोत्सवाचे औचित्य साधून विरारच्या विवा महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ आणि हॉटेल मॅनेजमेंट विभागांतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : गणेशोत्सवाचे औचित्य साधून विरारच्या विवा महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ आणि हॉटेल मॅनेजमेंट विभागांतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी वाङ्मय मंडळाने कोलाजातून गणेशरूप आणि आरती स्पर्धेचे आयोजन केले होते. या दोन्ही स्पर्धांना विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. आपल्याला भावलेल्या गणेशाचे रूप कोलाजातून साकारण्यासाठी एकंदर २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत श्वेता शेलारला प्रथम, प्रियंका बतावले हिला व्दितीय आणि दर्शना किणी हिला तृतीय क्र मांक मिळाला.
आरती स्पर्धेतही एकंदर दहा गट सहभागी झाले होते. मराठी आणि हिंदी भाषेतील कोणत्याही पाच आरत्या यावेळी विद्यार्थ्यांना सादर करायच्या होत्या. घंटा, टाळ आणि टाळ््यांच्या साथीने रंगलेल्या या स्पर्धेला दर्शकांचाही मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत प्रथम वर्ष बी.ए.च्या एका गटाने प्रथम क्र मांक तर प्रथम वर्ष बीएमएमच्या गटाने व्दितीय क्र मांक पटकावला. प्रथम वर्ष बी.ए.च्या दुस-या गटाला उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले
हॉटेल मॅनेजमेंट विभागानेही इनोवेटिव्ह मोदक स्पर्धेचे आयोजन केले होते. ओले खोबरे आणि गूळ यांचे मिश्रण गव्हाच्या किंवा तांदळाच्या पारीत भरून जेव्हा मोदक तयार होतो तेव्हा डाएटवर असणाऱ्यांनाही ते खायचा मोह आवरत नाही.
मात्र पारंपरिक सारणापेक्षा काही हटके सारणांचे मोदक बनवण्याची स्पर्धा प्रथम आणि तृतीय वर्षाचे विद्यार्थी अशा दोन गटांत घेण्यात आली. एकंदर ४0 विविध सारणांचे प्रकार यात सादर झाले. पहिल्या गटात कोकोनट मोदक, चॉकलेट मोदक आणि चॉकलेट मोदक विथ कॅरेमल सॉस यांना अनुक्र मे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्र मांक मिळाला. तर थ्री डी मोदकाला उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरवण्यात आले. दुसऱ्या गटात माऊथ ब्लास्ट मोदक, पान मोदक, बेक्ड मोदक विथ बिटल नट लिव्हज आणि पनीर मोदक यांना अनुक्र मे प्रथम, व्दितीय, तृतीय
आणि उत्तेजनार्थ क्र मांक मिळाले. (प्रतिनिधी)