गृहमंत्रालयाचे आदेश धुडकावून दिंडोशी महोत्सवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:05 AM2021-02-15T04:05:57+5:302021-02-15T04:05:57+5:30

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासन व पालिका प्रशासन यांनी घालून दिलेल्या अटी व नियमांची पायमल्ली करीत गोरेगाव (पूर्व) ...

Organizing Dindoshi Festival in defiance of Home Ministry orders | गृहमंत्रालयाचे आदेश धुडकावून दिंडोशी महोत्सवाचे आयोजन

गृहमंत्रालयाचे आदेश धुडकावून दिंडोशी महोत्सवाचे आयोजन

Next

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासन व पालिका प्रशासन यांनी घालून दिलेल्या अटी व नियमांची पायमल्ली करीत गोरेगाव (पूर्व) सामना परिवाराच्या बाजूला खडकपाडा येथील मोकळ्या जागेवर दिंडोशी उत्सव केला जात आहे. येत्या १६ फेब्रुवारीपासून दहा दिवस येथील दिंडोशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याखान, कीर्तन, मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली असून, केवळ ऑनलाइन पद्धतीनेच हे कार्यक्रम घ्यावेत, असेही गृह खात्याने सूचवले आहे.

अशातच दिंडोशी विभागात दिंडोशी महोत्सवाचे आयोजन समता परिषदेतर्फे विलास घुले यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती धूमधडाक्यात मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यावर शासनाने नियमावली केली असता दिंडोशी महोत्सवासारखे कार्यक्रम कसे आयोजित केले जातात आणि त्यांना मनपा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही, असा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.

Web Title: Organizing Dindoshi Festival in defiance of Home Ministry orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.