मृणालताई स्मरणोत्सव पर्यावरणविषयक स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:00+5:302021-07-07T04:07:00+5:30
मुंबई : माजी विरोधी पक्षनेत्या दिवगंत मृणाल गोरे पुण्यतिथीनिमित्त मृणालताई स्मरणोत्सवात पर्यावरणविषयक स्पर्धेचे आयोजन साद प्रतिसाद संस्थेच्या वतीने करण्यात ...
मुंबई : माजी विरोधी पक्षनेत्या दिवगंत मृणाल गोरे पुण्यतिथीनिमित्त मृणालताई स्मरणोत्सवात पर्यावरणविषयक स्पर्धेचे आयोजन साद प्रतिसाद संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे, असे सुधीर मोरे व संदीप सावंत यांनी सांगितले. सदर स्मरणोत्सव निमित्ताने चित्रकला, पत्रलेखन, वक्तृत्व यांसारख्या स्पर्धांचे वयोगटानुसार आयोजन केले आहे. चित्रकलेसाठी माझा स्वच्छ परिसर, पर्यावरण, जल संचयन वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे असे विषय आहेत. वक्तृत्व स्पर्धेकरिता माझा स्वच्छ परिसर, पर्यावरण, जल संचयन, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे, माझा लोकप्रतिनिधी कसा असावा, दिंडोशी डोंगर वन विभाग जाहीर करावा, वलभट नदीच्या पाण्याचे संचयन, मोकळे पादचारी मार्ग माझा अधिकार, माझी मराठी शाळा, रेन वॉटर हार्वेस्टिंग हे विषय आहेत. पत्रलेखन स्पर्धेकरिता माझा स्वच्छ परिसर, पर्यावरण, जल संचयन, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे, माझा लोकप्रतिनिधी कसा असावा, मोकळे पादचारी मार्ग माझा अधिकार, नगर राज बिल क्षेत्र सभा मला संविधानाने दिलेला अधिकार हे विषय आहेत. महिलांकरिता खासकरून कलाकुसर स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धांमध्ये सहभागाकरिता आभास केसकर ९९६७९६६३४६ यांच्याशी संपर्क साधावा.