Join us

मुंबईकरांसाठी ऑनलाईन योगासन स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:05 AM

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, मुंबई महानगर आणि अन्य सेवाभावी संस्थांच्या सहयोगाने ...

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, मुंबई महानगर आणि अन्य सेवाभावी संस्थांच्या सहयोगाने ऑनलाईन योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २० जून ते २७ जूनदरम्यान आयोजित करण्यात आली असून केवळ मुंबईतील नागरिकच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा एकूण ७ गटांमध्ये आयोजित करण्यात आली असून प्रत्येक गटाला दिल्या गेलेल्या ४ आसनांपैकी कोणतेही २ आसन, तसेच २ सूर्यनमस्कार स्पर्धकांना करायचे आहेत.

योगासनांचा संपूर्ण व्हिडिओ हा जास्तीत जास्त ३ मिनिटांचा असणे आवश्यक असून व्हिडिओची साइज १५० एमबीपेक्षा अधिक नसावी. https://forms.gle/CctdQYehUbzRoTEx7 या गुगल फॉर्म लिंकवर आवश्यक माहितीसह २० ते २७ जून या कालावधीमध्ये हे व्हिडिओ पाठवायचे आहेत. प्रत्येक गटानुसार ३ पुरस्कार देण्यात येणार असून सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या गटातील स्पर्धकांनी केवळ योगासने करायची आहेत, तर ३ ते ७ गटांमधील स्पर्धकांनी योगासने आणि सूर्यनमस्कार करणे अनिवार्य आहे.

गट क्रमांक १ मध्ये ५ ते ८ वयोगटातील स्पर्धकांना चक्रासन. पश्चिमोत्तानासन, मयूरासन. बद्ध हस्तपद्मासना, गट क्रमांक २ मध्ये ९ ते १२ वयोगटातील स्पर्धकांना जानुशीर्षासन, मयूरासन. सर्वांगासन, चक्रासन. गट क्रमांक ३ मध्ये १३ ते १६ वयोगटातील स्पर्धकांना कुक्कुटासन, पश्चिमोत्तानासन, गोमुखासन, अर्ध मच्छिद्रासन, गट क्रमांक ४ मध्ये १७ ते २५ वयोगटातील स्पर्धकांना धनुरासन, अर्ध मत्स्येन्द्रासन, बद्ध हस्तपद्मासन, मयूरासन. गट क्रमांक ५ मध्ये २६ ते ३५ वयोगटातील स्पर्धकांना गरुड़ासन, उष्ट्रासन, चक्रासन, बकासन, गट क्रमांक ६ मध्ये ३६ ते ५० वयोगटातील स्पर्धकांना सुप्त वज्रासन, हलासन, वृश्चिकासन, भू नमनासन. गट क्र ७ मध्ये ५१ वर्षांहून अधिक असणाऱ्या स्पर्धकांना शलभासन, मत्स्यासन, अर्ध मत्स्येन्द्रासन, पद्म सर्वांगासन हे प्रकार करायचे आहेत.

सहयोगी संस्थामध्ये श्री अंबिका योगाश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारत विकास परिषद, सेवा सहयोग फाउंडेशन, आरोग्य भारती, सक्षम, कच्छ युवक संघ, माय ग्रीन सोसायटी, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ (मेवाड) यांचा सहभाग आहे.