‘विज्ञानवादी सावरकर’ व्याख्यानाचे आयाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:06 AM2021-06-26T04:06:32+5:302021-06-26T04:06:32+5:30

मुंबई : सावरकरांनी बोटीतून समुद्रात उडी घेतलेल्या पराक्रम दिनाचे औचित्य साधत मराठी विज्ञान परिषदेने विज्ञानवादी सावरकर या व्याख्यानाचे आयोजन ...

Organizing ‘Scientific Savarkar’ Lecture | ‘विज्ञानवादी सावरकर’ व्याख्यानाचे आयाेजन

‘विज्ञानवादी सावरकर’ व्याख्यानाचे आयाेजन

Next

मुंबई : सावरकरांनी बोटीतून समुद्रात उडी घेतलेल्या पराक्रम दिनाचे औचित्य साधत मराठी विज्ञान परिषदेने विज्ञानवादी सावरकर या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ७ जुलैला सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या ऑनलाईन कार्यक्रमात सावरकर चरित्राचे अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे हे व्याख्यान देतील.

.................................................................................

‘विज्ञान विविधा’अंतर्गत ऑनलाइन मार्गदर्शन

मुंबई : मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान विविधा या कार्यक्रमात २६ जूनला दुपारी ४ ते सायंकाळी पाच या वेळेत विज्ञान संकल्पनेवर आधारित ऑनलाइन कार्यक्रमात सुचेता भिडे आणि अनघा वक्टे मार्गदर्शन करणार आहेत.

.................................................................................

गणित संबोध परीक्षा हाेणार ऑनलाइन

मुंबई : बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळ, मुंबई गणित संबोध परीक्षेचे आयोजन करीत असून, ही परीक्षा विद्यार्थ्यांनी आधीच्या इयत्ताचे संबोध किती प्रमाणात आत्मसात केले त्याचे मूल्यमापन करते. यावर्षी परीक्षा ऑनलाइन होईल. आठवीची परीक्षा १ ऑगस्टला होईल. परीक्षेसाठी वैयक्तिक नोंदणी १० जुलैपर्यंत करायची आहे. मराठी व इंग्रजी माध्यमात शिकणारे देशभरातील विद्यार्थी परीक्षेसाठी नावे नोंदवू शकतात.

.........................................................................................

Web Title: Organizing ‘Scientific Savarkar’ Lecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.