भाजपकडून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 'शिवकल्याण राजा' कार्यक्रमाचे आयोजन
By मनोहर कुंभेजकर | Updated: June 18, 2024 19:18 IST2024-06-18T19:17:41+5:302024-06-18T19:18:48+5:30
मुंबई भाजपाच्या वतीने 'शिवकल्याण राजा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपकडून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 'शिवकल्याण राजा' कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई -महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला तिथीनुसार ३५१ वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने मुंबईभाजपाच्या वतीने 'शिवकल्याण राजा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम गुरुवार दि,२० जून रोजी, सायंकाळी ६.३० वाजता माटुंगा (प.) येथील यशवंत नाट्यगृहात होणार आहे.
कार्यक्रमात सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ तसेच कोकण विकास आघाडी यांच्या सहकार्याने मुंबई भाजपा आयोजित गणेशोत्सव स्पर्धा २०२३ "मुंबई" देखावा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारुड, गोंधळ, पोवाडा, शिवराज्याभिषेक सोहळ्याचा नाट्यानुभव अशा विविधतेने नटलेला कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेलार यांनी केले आहे.