- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नवी मुंबईतील वाशी येथे २८ ते ३० जुलै २०१७ या कालावधीत बस, तसेच कार प्रवाशांसाठी ‘सुरक्षा, विश्वासार्हता आणि आधुनिक सेवा’ या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहे.जवळपास ३ हजार बस आॅपरेटर्स, १० हजार व्यावसायिक व्हिजिटर्स आणि १००हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील, अशी अपेक्षा या उपक्रमाचे आयोजक बस आॅपरेटर्स कॉन्फडरेशन आॅफ इंडिया (बीओसीआय) व एमएम अॅक्टिव्ह साय-टेक कम्युनिकेशन यांनी व्यक्त केली आहे. सर्वोत्कृष्ट सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेल तयार करण्यासाठी, तसेच सखोल एकत्रीकरणासाठी प्रथमच सार्वजनिक व खासगी बस आॅपरेटर्स एकत्र येणार आहेत.
नवी मुंबईत ‘प्रवास २०१७’चे आयोजन
By admin | Published: May 17, 2017 3:47 AM