लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रात स्थानिक भाजपा
खासदार गोपाळ शेट्टी यांच्या ५००० पिशव्या रक्त संकलनाचे आव्हान स्वीकारून गेल्या ४ एप्रिलपासून सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन सुरू आहे. येथील प्रत्येक वॉर्डातील नगरसेवक व विविध सामाजिक संस्था आणि तरुण पिढी पुढाकार घेऊन येथे रक्तदान शिबिरे आयोजित करत आहे. उत्तर मुंबईत शनिवारी दोन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. यावेळी एकूण १०० पिशव्या रक्त संकलन झाले.
घाणेकर मित्र मंडळ आणि भारतीय जनता पक्ष मागाठाणे विधानसभा वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. दरेकर आणि
खासदार गोपाळ शेट्टी यांनी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. माजी नगरसेवक आणि भाजप मुंबई सचिव विनोद शेलार, भाजप मुंबई उपाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, मागाठाणे भाजप अध्यक्ष दिलीप उपाध्याय, सरचिटणीस भरत घाणेकर, महेश राऊत, मोतीभाई देसाई आणि अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी एकूण ५४ युनिट रक्त संकलन झाले.
कांदिवली पूर्व विधानसभेत वॉर्ड क्रमांक २४च्या भाजप नगरसेविका सुनीता यादव, ऊर्जा फाउंडेशन, तसेच स्वनिधी महिला मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात स्थानिक आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते. या शिबिरात एकूण ४६ रक्त पिशव्या रक्त संकलन झाले.
खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर व सर्व मान्यवरांनी रक्तदाता, चिकित्सक व सामाजिक कार्यकर्ते अरुण केजरीवाल यांचा सत्कार केला.
----------------------------------------------------