महापालिकेतर्फे पुरुष नसबंदी सप्ताहाचे आयोजन

By admin | Published: November 1, 2015 02:17 AM2015-11-01T02:17:09+5:302015-11-01T02:17:09+5:30

७ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय जागतिक पुरुष नसबंदी दिन असून, यानिमित्ताने मुंबई महापालिकेच्या वतीने २ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पुरुष नसबंदी सप्ताहाचे आयोजन

Organizing a Vasectomy Week by Municipal Corporation | महापालिकेतर्फे पुरुष नसबंदी सप्ताहाचे आयोजन

महापालिकेतर्फे पुरुष नसबंदी सप्ताहाचे आयोजन

Next

मुंबई : ७ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय जागतिक पुरुष नसबंदी दिन असून, यानिमित्ताने मुंबई महापालिकेच्या वतीने २ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पुरुष नसबंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिनटाक्याची पुरुष नसबंदी ही सुरक्षित, साधी, कमी वेळेत होणारी शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया ५ ते १० मिनिटांत करण्यात येते. ती बिनटाक्याची आणि कटरहित आहे. शस्त्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय होते. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण त्वरित एका तासात घरी जाऊ शकतो. शस्त्रक्रिया करणाऱ्या लाभार्थ्याला १ हजार ४५१ रुपये व प्रेरणा देणाऱ्याला २०० रुपये उत्तेजनार्थ रक्कम दिली जाते. (प्रतिनिधी)

पुरुष नसबंदी सेवेचा पत्ता
कुटुंब कल्याण केंद्र, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल, वेळ - सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत,
अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक : ०२२-२४१८४८४१, ०२२- २४१८०५२१

Web Title: Organizing a Vasectomy Week by Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.