Join us

कागदात जीव ओतणारी ‘ओरिगामी’

By admin | Published: December 12, 2014 12:59 AM

कागदाला माणसांच्या बोटांचा स्पर्श झाला की, सुंदर कलाकृती जन्माला येते. कागदात जीव ओतला जातो.

मुंबई : कागदाला माणसांच्या बोटांचा स्पर्श झाला की, सुंदर कलाकृती जन्माला येते. कागदात जीव ओतला जातो.  कात्री, गोंद न वापरता कागदाला फक्त घडय़ा घालून विविध रूपांनी तो जिवंत होतो. कागदात जीव ओतणारी ही कला आहे ‘ओरिगामी’. याच कलेद्वारे साकारलेल्या थक्क करणा:या कलाकृती ओरिगामी मित्र आयोजित ‘वंडरफोल्ड 2क्14’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.
सर जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्टच्या दालनात आयोजित ‘वंडरफोल्ड 2क्14’ या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी आंतरराष्ट्रीय ओरिगामिस्ट मीनाक्षी मुखर्जी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अभिनेते श्रेयस तळपदे, साहित्यिक अनिल अवचट, ओरिगामी मित्रच्या पद्मजा प्रधान आणि इतर सदस्य उपस्थित होते. या प्रदर्शनात फक्त एकाच कागदापासून प्राणी, पक्षी, मानवाकार मुखवटे, फुले-पाने- पुष्पगुच्छ, फुलपाखरे, क्विल्ट्स, तारे, डबे, कीटक, वाडगे-वाटय़ा या अगदी ख:याखु:या कलाकृती कलारसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय जपानी शैलीतील कुसुदामा, किरीगामी, डायनिंग टेबल आणि थ्रीडी कलाकृती न्याहाळताना रसिक जणू थक्क होऊन जात आहेत.
या प्रदर्शनात आठ वर्षापासून ते अगदी पंचाहत्तरी उलटलेल्या आजी-आजोबांनी साकारलेल्या कलाकृती आहेत. मुंबई, पुणो, बंगळूर आणि अहमदाबाद येथील कलाकारांनी यंदा या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. शिवाय, या प्रदर्शनात ओरिगामीच्या शास्त्रीय पद्धतीही साकारण्यात आल्या आहेत. तसेच या ठिकाणी जपानी शैलीचे पारंपरिक खेळही मांडण्यात आले आहेत आणि विशेष म्हणजे प्रदर्शनास भेट देणारे कलारसिक ही खेळणी हाताळून प्रत्यक्ष अनुभवही घेऊ शकणार आहेत. हे प्रदर्शन 14 डिसेंबर्पयत कलारसिकांसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत खुले राहील. (प्रतिनिधी)
 
‘नासा’तही वापर
अवकाश विज्ञानातही ओरिगामीचा उपयोग झाला आहे. ‘नासा’ या संस्थेच्या एका उपग्रहाच्या सौर घट प्रणालीसाठी रोबर्ट लँग या ओरिगामी तज्ज्ञाने टॅसलेशन प्रकारानुसार आरेखन केले. 
ती प्रणाली छोटय़ा जागेत घडीच्या पंख्यासारखी सामावली जाऊन, तो उपग्रह अवकाशात गेल्यावर घडी उलगडून सौर घट पूर्णपणो विस्तारला. तंत्रज्ञानाला ओरिगामीचा असाही हातभार लागला. शिवाय, परदेशातील वाहनांमध्ये असणा:या ‘एअरबॅग्स’मध्येही ओरिगामी कलेचा वापर होतो.
 
जपानी संस्कृतीतील महत्त्व
जपानमध्ये अनेक शतकांपासून ओरिगामी कला जोपासली जात असल्यामुळे जपानच्या समाज जीवनातही महत्त्वाचे स्थान आहे. ओरिगामीचे हजार सारस पक्षी तयार केल्यावर आपल्या मनातली एक इच्छा पूर्ण होते ही भावना, आपल्या घराला वाईट गोष्टींची नजर लागू नये म्हणून कुसुदामामध्ये औषधी वनस्पती भरून ते घराच्या दरवाजावर टांगून ठेवण्याची पद्धत अशा रीतीरिवाजांमधून ही कला जपानी लोकांच्या मनात रुजली आहे.
 
ओरिगामीच्या सोबतीने गणित
या प्रदर्शनात पुण्याच्या मंजुश्री धुमे यांनी ओरिगामीच्या साहाय्याने गणित शिकण्याचे तंत्र मांडले आहे. शालेय विद्याथ्र्याचा गणिताशी असणारा छत्तीसचा आकडा या पद्धतीच्या माध्यमातून पुसून निघेल, असा विश्वास मंजुश्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.