Join us

अनाथालयांना भोजन अनुदान नाहीच

By admin | Published: January 15, 2016 1:37 AM

राज्यातील हजारावर अनाथालयातील ८० हजार अनाथ-निराश्रित बालकांची दिवाळी भोजन अनुदानाअभावी अंधारातच गेल्यानंतर संक्रांत निश्चितपणे गोड होईल, असे आश्वासन

मुंबई : मालाडमधील कुरार परिसरात जादूटोणा करत, ‘गुप्तधन’ मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या एका भोंदूबाबासह पाच जणांवर गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर उर्वरित चार जणांचा शोध सुरू असून, यात एका महिलेचाही समावेश आहे. पहलु गौडा (५५) असे अटक इसमाचे नाव असून, तो कुराराच्या बंजारीपाडा येथील पाल नगरमधील शिवसम्राट सोसायटीमध्ये राहतो.कुरार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या घरामध्ये खड्डा खणून तंत्रमंत्र करत होता. खोदकाम, मंत्राचा जप आणि अगरबत्ती-धूप अशा वातावरणामुळे येथे नरबळी दिला जात असल्याचा संशय शेजाऱ्यांना आला. शेजाऱ्यांनी माहिती दिल्यावर कुरार पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली आणि गौडाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी गौडाला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. चौकशीच्या वेळी ‘गुप्तधन’ मिळविण्यासाठी आम्ही पूजा करत होतो, असे त्याने कबूल केले. घटनास्थळावरून फरार चौघांचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)