अनाथ आश्रम, रस्त्यांवरील मुलांना मिळाले नृत्याचे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 03:03 AM2020-02-16T03:03:51+5:302020-02-16T03:03:57+5:30

नृत्यदिग्दर्शक लॉन्गनेस फर्नांडिस म्हणाले की, रे आॅफ होप संस्थेचे

Orphaned ashram, children's street dance platform | अनाथ आश्रम, रस्त्यांवरील मुलांना मिळाले नृत्याचे व्यासपीठ

अनाथ आश्रम, रस्त्यांवरील मुलांना मिळाले नृत्याचे व्यासपीठ

Next

मुंबई : ‘रे आॅफ होप’ संस्थेतर्फे अनाथाश्रम आणि वंचित मुलांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘डान्स दिल से’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला येथील सरिता लॉज येथे नृत्य स्पर्धा पार पडली. सोलो, ड्युएट आणि ग्रुप डान्स अशा तीन प्रकारांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. यंदा डान्स दिल से या नृत्य कार्यक्रमाचा चौथा सीझन होता.

नृत्यदिग्दर्शक लॉन्गनेस फर्नांडिस म्हणाले की, रे आॅफ होप संस्थेचे अध्यक्ष एडवर्ड परेरा हे या मुलांच्या कलागुणांना एक मोठे व्यासपीठ सादर करतात. दुर्लक्षित समाजासाठी परेरा एक चांगले काम करत आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते कोलंबिया कालिधर म्हणाल्या की, मुलांचे नृत्य पाहून अंगावर काटा उभा राहिला. या मुलांमध्ये कला लपली असून तिला अशा माध्यमातून पुढे आणणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. माझा अशा कार्यक्रमांसाठी नेहमीच पाठिंबा आहे. ‘लोकमत’ या नृत्य कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
एडवर्ड परेरा म्हणाले की, मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील अनाथ आश्रम व रस्त्यावर राहणारी मुले या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. तिसरी ते बारावीमध्ये शिकत असलेल्या अनाथ आश्रम व रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी ही स्पर्धा होती. संस्थेमार्फत स्पर्धेतून जिंकलेल्या मुलांना नृत्याचे प्रशिक्षण देऊन रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाठविले जाणार आहे. एकंदरीत अनाथ मुलांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य करत आहोत. या वेळी अभिनेत्री रूही चतुर्वेदी या अपंग नृत्य पाहून आश्चर्यचकित झाल्या.
 

Web Title: Orphaned ashram, children's street dance platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई