उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ!, अभ्यासगट स्थापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:45 AM2020-08-21T05:45:06+5:302020-08-21T05:45:11+5:30

मंत्रालयात झालेल्या या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Osmanabad will set up an independent university !, study group | उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ!, अभ्यासगट स्थापणार

उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ!, अभ्यासगट स्थापणार

Next

मुंबई : विद्यार्थ्यांच्या हितासाठी उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का, यासाठी सात सदस्यांचा अभ्यासगट उच्च व तंत्रशिक्षण विभाग स्थापन करणार आहे. या विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी एका बैठकीत ही माहिती दिली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे. या भौगोलिक अंतराचा विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी अभ्यासगट स्थापन केला जाईल.

हा अभ्यासगट विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या अडचणी काय आहेत, या सर्व शैक्षणिक दृष्टीने अभ्यास करून तीन महिन्यांत शासनाकडे अहवाल सादर करील. बैठकीस उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आदी उपस्थित होते.

Web Title: Osmanabad will set up an independent university !, study group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.