Join us

उस्मानाबादचे पालकमंत्री तिस-यांदा बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 4:50 AM

भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या ३ वर्षांत तिस-यांदा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले असून, आता वस्त्रोद्योग व पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मुंबई : भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या ३ वर्षांत तिस-यांदा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले असून, आता वस्त्रोद्योग व पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.राज्यात सत्तांतर होताच उस्मानाबादच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सोपविली. मात्र, ते पुरेसा वेळ देऊ न शकल्याने त्यांना बदलून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे जबाबदारी दिली. रावते यांनी दौरे करून आढावा बैठका घेतल्या. मात्र, त्यानंतर ते फक्त १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला झेंडावंदन कार्यक्रमास हजेरी लावत. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक तीनदा पुढे ढकलली. जिल्हा आरखड्यास मंजुरी मिळण्यास विलंब झाला. शिवाय, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाºयांशी रावते यांचे पटत नव्हते. तशा तक्रारीही ‘मातोश्री’पर्यंत पोहोचल्या होत्या.मुंबईकर पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्याचा विकास खुंटल्याची चर्चा होती. त्यामुळे रावतेंच्या जागी जालन्याचे अर्जुन खोतकर यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :शिवसेना