मुख्यमंत्र्यांचे मेहुणे पाटणकरांच्या अन्य मालमत्ताही ईडीच्या रडारवर; अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 07:21 AM2022-03-25T07:21:42+5:302022-03-25T07:23:04+5:30

ठाण्यातील मालमत्तांची झाडाझडती, अडचणीत वाढ

Other properties of CM uddhav thackerays brother in law Patankar are also on ed radar | मुख्यमंत्र्यांचे मेहुणे पाटणकरांच्या अन्य मालमत्ताही ईडीच्या रडारवर; अडचणी वाढणार

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे पाटणकरांच्या अन्य मालमत्ताही ईडीच्या रडारवर; अडचणी वाढणार

googlenewsNext

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि व्यावसायिक श्रीधर पाटणकर यांच्या आणखीन काही मालमत्ता ईडीच्या रडारवर आहे.  त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पाटणकरांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीला हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याने बनावट कंपनीच्या माध्यमातून एकूण ३०  कोटींचे विनातारण कर्ज दिले. ही रक्कम पाटणकरांनी अन्य बांधकाम प्रकल्पातही वापरल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे ईडीचे अधिकारी पाटणकरांच्या कंपनीने राबविलेल्या अन्य प्रकल्पांचीही माहीती गोळा करत आहेत.  ईडीने पाटणकरांची भागीदारी असलेल्या ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील आणखी एका गृहनिर्माण प्रकल्पावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.  ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी गुरुवारी या गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या प्रकल्पात चतुर्वेदीने आर्थिक गुंतवणूक केल्याचा ईडीला संशय आहे. सोबतच पाटणकरांच्या मुंबई आणि ठाण्यातील प्रकल्पांचीही झाडाझडतीही ईडीचे अधिकारी करत आहेत. दुसरीकडे याप्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या चतुर्वेदीच्या शोधासाठी ईडीचे पथक मुंबईबाहेर आहेत. त्याला समन्स बजावूनदेखील ते हजर न झाल्यामुळे  त्यांना दुसरे समन्स बजावण्यात येणार आहे. तसेच, ते परदेशात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ईडीमार्फत कारवाईचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न : वरुण सरदेसाई
पनवेल :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या घरात थेट ईडी पोहोचल्याने हा अप्रत्यक्ष ठाकरे परिवाराला हादरा मानला जात आहे. ईडीमार्फत भाजपने राज्यात मोहीम तीव्र केल्याचे दिसून येत आहे. या कारवाईबाबत युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांना विचारणा केली असता हा भाजपचा केविलवाणा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया गुरुवारी खारघर येथे दिली.

पाटणकर यांच्या ठाणे येथील मालमत्तांवर छापा टाकून मालमत्ता सील करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ईडी आणि भाजपचे हे शेवटचे प्रयत्न असून, याला ठाकरे सरकार झुकणार नसल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात सरदेसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी ते बोलत होते. 

या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक, शिवसैनिकांनी सहभाग घेतला. आरोग्य तपासणी शिबिरासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी शिबिरात रक्तदान केले. या शिबिरात पालिका आयुक्त गणेश देशमुख, सेनेचे नेते बबन पाटील, भरत पाटील, दीपक निकम, राकेश गोवारी, गुरुनाथ पाटील, अवचित राऊत, मनेश पाटील आदींसह मोठ्या संख्येने सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Other properties of CM uddhav thackerays brother in law Patankar are also on ed radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.