मुंबईकरांच्या भेटीला ‘आपले बाप्पा २०१६’
By admin | Published: September 4, 2016 03:57 AM2016-09-04T03:57:32+5:302016-09-04T03:57:32+5:30
बाप्पाचे आगमन अगदी काही तासांवर आले आहे. मुंबई आणि उपनगरात बाप्पाची लगबग पाहायला मिळत आहे. या महोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लोकमत, संस्कृती
मुंबई: बाप्पाचे आगमन अगदी काही तासांवर आले आहे. मुंबई आणि उपनगरात बाप्पाची लगबग पाहायला मिळत आहे. या महोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लोकमत, संस्कृती दर्पण प्रतिष्ठान आणि शुभविधी डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १३ सप्टेंबर या कालावधीत ‘आपले बाप्पा २०१६’ या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या माध्यामातून अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून भरपूर बक्षिसांची उधळण यावेळी करण्यात येणार आहे.
‘आपले बाप्पा २०१६’ या कार्यक्रमासाठी संस्कृती दर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय दास्ताने आणि सचिव श्वेता सरवणकर यांचे सहकार्य लाभले आहे. यंदा या उपक्रमाच्या माध्यमातून इको फ्रेंडली घरगुती गणपती मूर्ती आणि सजावट स्पर्धा, सार्वजनिक गणेश मंडळांकरिता इकोफ्रेंडली गणेशमूर्ती, सजावट स्पर्धा आणि सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश सजावट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी बाप्पाच्या सजावटीचे फोटो, नाव, पत्त्यासह ूङ्मल्ल३ंू३@२४ुँ५्रँ्रि.ूङ्मे यामेल आयडीवर पाठवून द्यावेत. अथवा अधिक माहितीसाठी ८६५२२००२२१, मनिषा सोलंकी - ९८१९२६०८८९ आणि प्रिती नायडू -९१६७४०४२६१ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
स्पर्धांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
६ सप्टेंबर
मुलांसाठी खेळ स्पर्धा
स्थळ- गुरुदत्त मित्र मंडळ, कोहिनूर मिल, चाळ क्रमांक ५ चे मैदान, महात्मा जोतिबा फुले रोड, नायगाव, दादर (पू.), वेळ- सायं. ४ ते ७ वाजेपर्यंत
७ सप्टेंबर
पाककला स्पर्धा (तिखट व गोड मोदक)
स्थळ- अंकुर मित्रमंडळ, दादासाहेब फाळके रोड, दादर (पू.), वेळ- सायं. ४ ते ७ वाजेपर्यंत
११ सप्टेंबर
स्वच्छता अभियान, स्थळ- गणेश महाद्वार, शिवाजी पार्क, दादर (प.) वेळ- सकाळी ११ ते सायं. ४ वाजेपर्यंत
१२ सप्टेंबर
नृत्य स्पर्धा (खुला गट)
स्थळ- राजाराम वाडी, गणेश उत्सव मंडळ, नायगाव हायस्कुल जवळ
वेळ- सायं. ४ ते ७ वाजेपर्यंत
१३ सप्टेंबर
स्त्रियांसाठी खेळ आणि
विविध स्पर्धा
स्थळ- निळकंठ अपार्टमेंट, गोकुलदास पास्ता रोड,दादर
वेळ- सायं. ४ ते ७ वाजेपर्यंत
१८ सप्टेंबर
बक्षीस वितरण समारंभ,
मंगळागौर विशेष कार्यक्रम आाणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धा
‘शुभविधी’ची पर्वणी : सर्व धार्मिक शुभविधींसाठी असलेले हे अत्याधुनिक संकेतस्थळ आहे. या माध्यमातून आॅनलाइन वधू-वर सूचक मंडळ, शास्त्रोक्त पद्धतीने अनुष्ठाने, आवर्तन पूजा, शांती पाठ होमहवन या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच, निमंत्रण पत्रिका डिझाइन आणि प्रिंटींगही करण्यात येते. साखरपुडा, हळद वइतर सर्व समारंभांसाठी हॉल व मैदाने उपलब्ध करुन दिली जातात.