मुंबई : यंदा गणेशोत्सवात आपले बाप्पा समारंभाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. सुखकर्ता, विघ्नहर्ता भगवान श्रीगणेश बुद्धीची देवता आहे. मोठ्या उत्साहाने बुद्धीच्या या देवतेची विधिपूर्वक पूजा केली जाते. नैवेद्य, आरती आणि पुष्पहार घालून प्रसाद अर्पण केला जातो. गणेशाला प्रसन्न करून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी भक्त गणेशाची उपासना, आराधना करतात. गणेशाची आपल्यावर कृपा कायम राहावी म्हणून कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत आपले बाप्पा उत्सवात ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’ या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नैवेद्य, हार, पूजा यांचे अनोखे मिश्रण असणार आहे. संस्कृतीची जपणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलर्स वाहिनीवर कौटुंबिक आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी मालिका ‘बालिका वधू’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रसारित करण्यात येत आहे. या मालिकेला सर्वाधिक लांब मालिका असण्याचा सन्मान लाभला आहे. सध्या ही मालिका दोन हजाराव्या भागाकडे जात आहे. आपल्या समाजात होणाऱ्या बालविवाहाच्या कुप्रथेविरुद्ध लढणाऱ्या आनंदीचा संघर्ष यात दाखविण्यात आला आहे. लहान मुलीपासून सशक्त आणि अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या लढवय्या आनंदीचा जीवनप्रवास आणि अन्य सामाजिक घटनाक्रमाच्या कारणाने ही मालिका प्रत्येक भागात प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करते आहे.आनंदीची अपहरण करण्यात आलेली मुलगी तिला कशी मिळेल? ती आनंदीला आपली आई म्हणून स्वीकारेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे दोन हजाराव्या भागात मिळणार आहेत. हा समारंभ मंगळवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता बी.एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठीच खुला आहे. कार्यक्रमात कलर्स वाहिनीवरील मालिका ‘बालिका वधू’वर आधारित काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या प्रश्नांचे योग्य उत्तर देणाऱ्या सखीला पुरस्कारही देण्यात येणार आहे. याशिवाय बाप्पाला मानवंदना ढोलताशे आणि नृत्याविष्काराच्या गजरात देण्यात येईल. यासाठी गिरगावचे सुप्रसिद्ध ‘गजर’ हे ढोलपथक आपला कलाविष्कार दाखविणार आहेत. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी सर्व सखींनी आवर्जून उपस्थित राहावे. (प्रतिनिधी)
‘आपले बाप्पा’ उत्सव रंगणार
By admin | Published: September 29, 2015 1:32 AM