आमचा दसरा मेळावा शिंदे गटाचा नव्हे, तर शिवसेनेचा आहे; उदय सामंत यांचं स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 05:18 PM2022-10-03T17:18:27+5:302022-10-03T17:25:00+5:30

शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. 

Our Dussehra gathering is not of the Shinde group, It was of the Shiv Sena; Explanation by Minister Uday Samant | आमचा दसरा मेळावा शिंदे गटाचा नव्हे, तर शिवसेनेचा आहे; उदय सामंत यांचं स्पष्टीकरण 

आमचा दसरा मेळावा शिंदे गटाचा नव्हे, तर शिवसेनेचा आहे; उदय सामंत यांचं स्पष्टीकरण 

Next

मुंबई- यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.

शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आण्याचा प्रयत्न करत आहे. याचदरम्यान शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. 

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का? नारायण राणेंनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले...

आमचा दसरा मेळावा हा काही शिंदे गटाचा नसून तो शिवसेनेचा आहे. तसेच त्यांचा महाविकास आघाडीचा मेळावा आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून ठाकरे गटाला मदत मिळत आहे. त्यांच्या गटातील काही नेते काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाला देखील पाठिंबा देण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचा मेळावा हा महाविकास आघाडीचा मेळावा असल्याचं सांगत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे डिवचल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर-

निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह शिवसेनेने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे. एकीकडे शिंदे गटाने टिझर लाँच केल्यानंतर आता ठाकरे गटानेही टिझर लाँच करत निष्ठेचा सागर उसळणार असल्याचे म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Our Dussehra gathering is not of the Shinde group, It was of the Shiv Sena; Explanation by Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.