Join us

जनसेवा करणारा लोकप्रतिनिधी निवडून आणणे हे आपले कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 2:43 AM

तरुणांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे कट्ट्यावरून रिपोर्टिंग

मतदारांशी थेट संवाद

जनतेची कामे करणाऱ्या उमेदवारालाच मतदान

यावेळी लोकसभा मतदानाला मी माझा मतदान करण्याचा हक्क बजावणार असून, नागरिकांच्या समस्या जाणून घेणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करेन. यासाठी मतदान ओळखपत्र मिळविण्याची प्रक्रिया मी वेळेत पूर्ण केली आहे. कार्यालयात जाऊन नोंदणी अर्ज भरणे, पूर्ण आणि योग्य ती माहिती त्यात भरण्यासाठी मित्रांनी मला मदत केली. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यांची पूर्तता केली. निवडणुकीच्या आधी ओळखपत्र मिळाल्याने मी मतदानाचा हक्क बजावू शकणार आहे.- अमन सिंग, तृतीय वर्ष, मुंबई विद्यापीठ.पहिल्या मतदानाची उत्सुकतामाझ्या शाळेमध्ये मतदार यादीत नाव नोंदणीचे अर्ज उपलब्ध होते. याची माहिती वडिलांना मिळाल्यावर त्यांनी लगेच माझ्यासाठी एक मतदान नाव नोंदणीचा अर्ज घरी आणला. मतदान नाव नोंदणीचा अर्ज भरल्यावर एका महिन्यात मतदान ओळखपत्र पोस्टाद्वारे घरी आले. येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मतदानाची संधी मिळणार आहे. त्यामुळे मतदान करण्याची उत्सुकता लागली असून, माझे मत योग्य उमेदवारालाच देणार. मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून वाया घालवू नका़- सेजल कांबळे, भाऊसाहेब हिरे कॉलेज आॅफ आर्किटेक्चर.कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही...मतदार यादीत नाव नोंदणीचा अर्ज भरून दिला आहे. आता मतदान ओळखपत्र येण्याची वाट पाहतोय. मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवणार आहे की, ज्या उमेदवाराने नागरी समस्या, बेरोजगारी आणि शिक्षणावर ज्याने जास्त काम केले आहे, तसेच सत्तेत असलेल्या उमेदवाराने दिलेली आश्वासने आणि कामे पूर्ण केली आहेत का? हे पाहूनच मत देणार. कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करणार. माझ्या मित्रपरिवाला सांगेन की, योग्य उमेदवारालाच आपले मत द्या, अन्यथा विकास अशक्य आहे़- जन्मेश परब, अनुयोग महाविद्यालय.मतदानाची ताकद खूप मोठीघराच्या जवळ मतदान कार्डाबाबत नोंदणी करण्यासाठी केंद्र होते. या केंद्रात जाऊन मतदान कार्डासाठी नोंदणी केली. आवश्यक कागदपत्रे देऊन सर्व प्रक्रिया पूर्ण केली. आता मतदान कार्ड काही दिवसांत येणार आहे. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मतदान करत असल्याने कौतुकास्पद वाटत आहे. मतदान नोंदणीसाठी प्रत्येकाला जागृत केले आहे. एका मताची ताकद खूप मोठी असल्याने प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. येणारी निवडणूक खूप रंगतदार होणार आहे. कोणत्याही आमिषाला न भुलता मतदान केले पाहिजे.- अंकित गुप्ता, सोमय्या कॉलेज.आपले मत किमती असल्याचा अभिमानमतदान आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काचा वापर प्रत्येक नागरिकांना केला पाहिजे. मतदान करण्यासाठी मतदान कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे मतदान कार्ड मिळविण्यासाठी आॅनलाइन संकेतस्थळाचा वापर केला. आॅनलाइन संकेतस्थळावरून नोंदणी करून सर्व कागदपत्र अपलोड केले. मात्र, आॅनलाइन नोंदणी करताना फोटो अपलोड करताना त्रास झाला. दोन महिन्यांत मतदान कार्ड हातात आले. आपल्या किमती मताने लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मिळाली असल्याने अभिमान वाटत आहे.- अर्चना जगताप, टी. वाय. बीए, रूईया महाविद्यालय. 

 

टॅग्स :मतदानलोकसभा निवडणूक