आमची लढाई धर्मांध पक्षाविरुद्ध - एमआयएम

By Admin | Published: February 7, 2017 04:31 AM2017-02-07T04:31:04+5:302017-02-07T04:31:04+5:30

आमची प्रमुख लढाई ही मुंबईच्या विकासाबरोबर धर्मांध शक्तीविरुद्ध आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत त्या ठिकाणी मतदारांनी धर्मनिरपेक्ष

Our fight against fanatic party - MIM | आमची लढाई धर्मांध पक्षाविरुद्ध - एमआयएम

आमची लढाई धर्मांध पक्षाविरुद्ध - एमआयएम

googlenewsNext

मुंबई : आमची प्रमुख लढाई ही मुंबईच्या विकासाबरोबर धर्मांध शक्तीविरुद्ध आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत त्या ठिकाणी मतदारांनी धर्मनिरपेक्ष व योग्य उमेदवारांना निवडून द्यावे, असे जाहीर आवाहन एमआयएमच्या वतीने नुकतेच करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या रिंगणात पहिल्यांदा उतरणाऱ्या एमआयएमने जाहीरनामाही काढलेला नसून पक्षाचे अध्यक्ष खा. ओवेसी यांनी दिलेल्या आश्वासनाच्या मुद्द्यावर मते मागणार आहेत. भायखळा, कुर्ला, गोवंडी, धारावी, मालाड आदी भागांतील ५९ ठिकाणी एमआयएमने उमेदवार उभे केले आहेत.
एमआयएमचे भायखळ्यातील आमदार अ‍ॅड. वारिस पठाण, हैदराबाद येथील आम. अहमद बिलाला, मुंबईचे अध्यक्ष शाकीर पटणी व समन्वयक लुकमान सिद्दिकी नदवी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीसंबंधीची भूमिका स्पष्ट केली. अ‍ॅड. पठाण म्हणाले, ‘२२ वर्षे सत्तेत असलेल्या सेना-भाजपाने केवळ भ्रष्टाचार व घोटाळे केले आहेत. मुंबईतील रस्ते, मुबलक पाणी या मूलभूत समस्या कायम असून, दोन्ही काँग्रेस, सपा विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यात अपयशी ठरली आहे. युतीने मुंबईत अल्पसंख्याक वस्ती असलेल्या ठिकाणी जाणीवपूर्वक विकासकामे केलेली नाहीत. त्यामुळे आमचे नगरसेवक निवडून आल्यावर या ठिकाणी ५०० कोटींचा
निधी आणतील, प्रबळ विरोधकांची भूमिका बजाविली जाईल.’’ (प्रतिनिधी)

Web Title: Our fight against fanatic party - MIM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.