आमचं प्रेम 'खुल्लम खुल्ला' तर शिवसेनेचं ते लपून, युतीबाबत 'मुख्यमंत्री प्रचंड आशावादी'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 07:51 AM2018-11-11T07:51:27+5:302018-11-11T07:52:24+5:30

देवेंद्र फडणवीस : भाजपा-शिवसेना यांची निवडणुकांत युती होणार

Our love is 'Khullam Khulla' and hide it from Shivsena, 'Chief Minister Prachanda optimists' | आमचं प्रेम 'खुल्लम खुल्ला' तर शिवसेनेचं ते लपून, युतीबाबत 'मुख्यमंत्री प्रचंड आशावादी'

आमचं प्रेम 'खुल्लम खुल्ला' तर शिवसेनेचं ते लपून, युतीबाबत 'मुख्यमंत्री प्रचंड आशावादी'

googlenewsNext

नागपूर : भाजपाचे शिवसेनेवर एकतर्फी प्रेम आहे, हा आरोप खरा नाही. शिवसेनेचेही भाजपावर तेवढेच प्रेम आहे. आम्ही प्रेम जाहीरपणे व्यक्त करतो, तर ते आमच्यावर लपून प्रेम करतात, असा दावा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केला. युती होणारच, असेही सुतोवाच त्यांनी केले. शिवसेना व भाजपाचे नेते ज्या पद्धतीने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने दोघांत निवडणूक युती होणार का, असा प्रश्न पडला असताना, मुख्यमंत्र्यांनी त्याचे असे उत्तर दिले.

पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्हाला युती करायची आहे. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण काळजीपूर्वक ऐकले, तर त्यांनीही तसे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे ही दोन्ही पक्षांची निवडणुकांसाठी युती होईलच. आम्ही शिवसेनेच्या प्रेमापोटी तसे उघडपणे सांगतो, ते आमच्यावर लपून प्रेम करतात. भाजपा-शिवसेना संबंधाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, भाजपाचे शिवसेनेवर एकतर्फी प्रेम आहे, असा नेहमी आरोप होतो, पण ते खरे नाही. शिवसेनेचेही भाजपावर तेवढेच प्रेम आहे. फक्त आम्ही प्रेम जाहीरपणे व्यक्त करतो, तर ते आमच्यावर लपून प्रेम करतात, असे मुख्यमंत्र्यांनी हसतच म्हणाले.

भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या युतीबाबत विचारता मुख्यमंत्री म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे एकमेव नेते आहेत, ज्यांनी आजवर कधीही भाजपाशी युती केली नाही. भाजपाविरुद्ध अनेक जण बोलतात, पण त्यांनी कधी ना कधी भाजपाशी समझोता केला आहे. एमआयएमशी आम्ही युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
गोसीखुर्द प्रकल्पातील महत्त्वाची कामे २०१९ पर्यंत पूर्ण होतील, असा दावा फडणवीस यांनी केला. रेती माफियाविरुद्ध राज्य सरकारने कडक धोरण अवलंबिले असून, एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘संभाजीनगर’चा प्रस्ताव जुनाच
औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याबाबतचा प्रस्ताव हा जुनाच आहे. युती सरकारच्या काळातच तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यात नवीन काहीही करायचे नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Our love is 'Khullam Khulla' and hide it from Shivsena, 'Chief Minister Prachanda optimists'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.