Join us

आमचा 'राजा' तुमच्या राजासारखं खोटं बोलत नाही, मनसेनं शेअर केला पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 11:25 AM

विद्यमान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं, याची माहिती स्वत: राज ठाकरेंनीच दिली. त्यावर भातखळकर यांनी स्पष्टीकरण देत राज ठाकरे यांना टोला लगावला

ठळक मुद्देअतुल भातळकर यांनी ते विधान खोट असल्याचे सांगितल्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा दाखला देण्यात आला आहे

मुंबई - भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तिकीट मागितलं होतं, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला एका वेबिनारमध्ये बोलताना केला. मनसेच्या पक्ष बांधणीसाठी तितकेच चांगले नेते पक्षात हवे असतात, पण आजवर अनेक नेते मनसेला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात गेले याबाबत राज ठाकरे यांना विचारण्यात आलं होतं. आता, मनसेनं यासंदर्भातील पुरावाच दिलाय. 

विद्यमान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं, याची माहिती स्वत: राज ठाकरेंनीच दिली. त्यावर भातखळकर यांनी स्पष्टीकरण देत राज ठाकरे यांना टोला लगावला. "राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा आणि असत्य आहे. यापूर्वीही त्यांनी असे आरोप केले, परंतु मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. २००९ च्या गोष्टीचा संदर्भ त्यांना २०२१ ला द्यावासा वाटतोय याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय," असं म्हणत भातखळकर यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

अतुल भातळकर यांनी ते विधान खोट असल्याचे सांगितल्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा दाखला देण्यात आला आहे. भाजपाचे काही नेते त्यांच्याकडे गेले की ते नितीन गडकरींना फोन करुन सांगायचे. राज ठाकरे म्हणतात ते खरंय... असं या मुलाखतीतील व्हिडिओत गडकरींनी म्हटलय. मनसेनं या व्हिडिओचा दाखला देत अतुल भातखळकर तोंडावर आपटल्याचं म्हटलंय. संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.  पक्ष सोडणं म्हणजे माझ्यासाठी आईचा त्याग

"गौप्यस्फोट करण्याकरता माझा असा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. मी भाजपमध्ये होतो, आहे आणि आयुष्यभर राहीन. माझ्या दृष्टीनं पक्ष सोडणं म्हणजे आईचा त्याग करण्यासारखं आहे. हे मी त्यावेळीही सांगितलं होतं आणि त्याचा पुनरूच्चार मी आताही करतोय," असं ते म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

"मनसेला नेते सोडून गेले असं अनेकदा सांगितलं जातं. पण जे सोडून गेले त्यांच्या फक्त एका बातमीशिवाय दुसरं काही झालं का? मला एक असं उदाहरण दाखवून द्यावं. माझ्याकडे बघून ते पक्षात आले आणि स्थानिक कारणांमुळे पक्ष सोडून गेले. आता पक्षांतराच्या गोष्टी होत असतात. नुकतंच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे नेते भाजपमध्ये गेले. त्यांचं काय झालं?", असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

"राज्याच्या २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तर भाजपचे अतुल भातखळकर माझ्याकडे आले होते. त्यांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं. मी नितीन गडकरींना फोन करुन त्यांची समजूत काढली होती की असं करू नका. ज्या पक्षात आहात त्यातच काम करत राहिलं पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेमनसेकोरोना वायरस बातम्याभाजपानितीन गडकरी