रसिकांना निखळ आनंद देणे आपले अंतिम ध्येय - नयना आपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:42 AM2019-06-06T01:42:59+5:302019-06-06T01:43:28+5:30

परळच्या सहकारी मनोरंजन मंडळाच्या वतीने ‘गप्पा दिलखुलास ह्य या मुलाखतीवरील आधारित कार्यक्रमात पडद्यावरील आणि पडद्यामागील रंगकर्मींना बोलते करुन नवा आदर्श नव्या पिढीपुढे आणण्याचा उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून राबविण्यात येत आहे.

Our ultimate goal to give pleasure to the celebrities - Nayana Apte | रसिकांना निखळ आनंद देणे आपले अंतिम ध्येय - नयना आपटे

रसिकांना निखळ आनंद देणे आपले अंतिम ध्येय - नयना आपटे

googlenewsNext

मुंबई : विनोदी नाटकातून रसिकांना निखळ आनंद देणे या सारखे सुख आणि समाधान अन्य कशात नाही. नाट्यभिनयी जीवन प्रवासात विनोदी अभिनय हाच आपला पाया आणि अंतिम ध्येय मानले आहे. अभिनयाशी तंतोतंत प्रमाणिक राहण्याचा प्रयत्न केला,म्हणूनच रसिकांच्या हृदयात कायम स्थान प्राप्त करता आले , अशा कृतज्ञपूर्वक भावना अभिनेत्री नयना आपटे यांनी व्यक्त केल्या.

परळच्या सहकारी मनोरंजन मंडळाच्या वतीने ‘गप्पा दिलखुलास ह्य या मुलाखतीवरील आधारित कार्यक्रमात पडद्यावरील आणि पडद्यामागील रंगकर्मींना बोलते करुन नवा आदर्श नव्या पिढीपुढे आणण्याचा उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ पत्रकार काशिनाथ माटल यांनी आतापर्यंत तीन मॅरेथॉन मुलाखती घेतल्या. या मुलाखतीत नयना आपटे यांनी प्रत्येक प्रश्नावर चौकार, षटकार ठोकत रसिकांना जवळपास दोन अडीच तास चांगलेच खिळवून ठेवले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाटककार दशरथ राणे होते.
आपल्या खडतर प्रवासाविषयी सांगताना आपटे म्हणाल्या की, महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच नृत्य,गायन, अभिनयाचे धडे घेत राहिले. एकदा कोण व्हायचंय हे मनाशी ठरविले आणि जिद्द, मेहनत आणि कष्टाची त्याला जोड मिळाली की कोणतीही गोष्ट साध्य करणे अशक्य नसते . पण आजची कलाकार बनू पहाणारी पिढी सतत व्हॉट्सअ‍ॅप,फेसबुक सारख्या सोशल मिडियाच्या आकर्षणात गुंतुन राहिली तर निव्वळ स्वप्न उराशी बाळगून उपयोग काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नाट्यप्रवासात राजा गोसावी यांनाच गुरु मानले आहे. त्यांच्याकडून टायमिंग साधण्याची कला, अभिनयाचे बारकावे शिकले. नाट्यप्रवासात चित्तरंजन कोल्हटकर, शशिकांत निकते, अरविंद देशपांडे,दाजी भाटवडेकर, दामू केंकरे यांच्या कडूनही बरेच शिकता आले असे सांगून आपटे यांनी नाट्य कलेत यशस्वी होण्यासाठी शुद्ध मराठी भाषा आणि स्पष्ट उच्चारण ,चोख पाठांतर आणि सहिंतेचा नीट अभ्यास महत्त्वाचा ठरतो असे सांगितले. हिंदी चित्रपटात काम करताना मोठे नाव मिळाले तरी त्या साठी स्वाभिमान कधी ही गहाण टाकला नाही. संगीतप्रधान नाटकांची आवश्यकता प्रतिपादून सहकारी मनोरंजन मंडळाच्या पायोनिअर म्हणून नाट्य कलेच्या प्रगतीसाठी सदैव सहकार्य करु असेहीे नयना आपटे यांनी सांगितले.

Web Title: Our ultimate goal to give pleasure to the celebrities - Nayana Apte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.