मुंबई- शिंदे गटाचं आता काउंटडाऊन सुरू झालं आहे. जानेवारीपासून लोकसभेचं काम सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या ११ खासदारांचा पत्ता कट होणार आहे, फक्त दोनच खासदारांनी उमेदवारी मिळणार आहे. दिल्लीतील एका खात्रीशीर सूत्राने मला ही माहिती दिली आहे. बाकीच्या खासदारांचं विसर्जन होणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला.
"रील्स बनवा, १० लाख कमवा"; जितेंद्र आव्हाडांचं तरुण पिढीला आवाहन
खासदार विनायक राऊत म्हणाले, बारसुतील प्रकरणावर राजकारण करण्याच काम सुरू आहे. कोकणातील लोकांच्यात सरकारबद्दल असंतोष आहे. सत्ताधाऱ्यांचा खोटापणा आम्ही पुढ आणणार आहे. मंत्रिमंडळाचा आता विस्तार होणार नाही, नेत्यांना आता गाजर दाखवण्याच काम सुरू आहे. महायुतीमध्ये बिघाडी दिसणार आहे.
"महायुतीमध्ये बिघाडी दिसणार आहे, आता काउंटडाऊन सुरू झालं आहे. जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुकीचे काम सुरू होईल, शिंदे गटातील ११ नेत्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही, फक्त दोन नेत्यांना आता उमेदवारी मिळणार आहे. मला दिल्लीतील एका खात्रीशीर सूत्राने ही माहिती दिली आहे, असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला.
खासदार राऊत म्हणाले, शिंदे सरकार ठाकरे गटातील नेत्यांना त्रास देत आहे. वायकर साहेब आणि पेडणेकर साहेब यातून सहीसलामत बाहेर येतील. बच्चू कडू नेहमी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं म्हणत आहे, पण विस्तार काही होतं नाही. शिंदे गटातील नेते आमच्या संपर्कात आहेत पण त्यांची आम्ही नावं जाहीर करणार नाही, असंही राऊत म्हणाले.