Join us

५४७१ अर्जांपैकी ४३३२ नवीन प्रकल्पांना नोंदणीक्रमांक मंजूर

By सचिन लुंगसे | Published: April 04, 2024 3:49 PM

प्रकल्प आश्वासित वेळेत पूर्ण व्हावेत, घरखरेदीदारांच्या तक्रारी उद्भवू नये यासाठी महारेरा नोंदणीक्रमांक देते

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नुकत्याच संपलेल्या 1 एप्रिल 23 ते 31 मार्च 24 या आर्थिक वर्षात  महारेराने नवीन नोंदणीक्रमांकासाठी आलेल्या 5471 नवीन प्रस्तावांपैकी 4332 नवीन प्रकल्पांना नोंदणीक्रमांक मंजूर केले आहेत. यात नेहमीप्रमाणे सर्वात जास्त प्रकल्प पुण्याचे असून ही संख्या 1172 आहे. यानंतर ठाणे 597, मुंबई उपनगर 528, रायगड 450, नागपूर 336, नाशिक 310 इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे.

राज्यातील प्रदेशनिहाय संख्या पाहिल्यास मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड हा  मुंबईलगतचा भाग आणि कोकणाचा समावेश असलेल्या महाप्रदेशातील प्रकल्पांची  संख्या 1976 अशी सर्वात जास्त  आहे. यानंतर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताराचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील 1415 प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळालेले आहेत. विदर्भातील 437 प्रकल्पांना नोंदणीक्रमांक मिळाले असून त्यात नागपूरचे 336 प्रकल्प आहेत. उत्तर महाराष्ट्रातील 347 नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले आहेत. त्यात नाशिकचे 310 प्रकल्प आहेत. मराठवाड्यातील 149 नवीन प्रकल्पांना नोंदणीक्रमांक मिळालेले आहेत. त्यात औरंगाबादचे 117 नवीन प्रकल्प आहेत. दादरा नगर हवेलीचेही 8 प्रकल्प आहेत.

प्रकल्प आश्वासित वेळेत पूर्ण व्हावेत, घरखरेदीदारांच्या तक्रारी उद्भवू नये यासाठी महारेरा नोंदणीक्रमांक देताना प्रत्येक प्रकल्पाची वैद्यता(Legal) आर्थिक ( Financial) आणि तांत्रिक ( Technical) अशा त्रिस्तरीय पातळीवर कठोर छाननी करूनच नोंदणीक्रमांक मंजूर करते.  याशिवाय कल्याण -  डोंबिवली भागातील प्रकल्पांतील अनियमिततांच्या पार्श्वभूमीवर शासनाने नोंदणीक्रमांक देण्यापूर्वी संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून 'बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र' (CC) त्यांच्या पदनिर्देशित ईमेल वरून महारेराच्या पदनिर्देशित इ-मेलवर पाठवणे बंधनकारक केलेले आहे.

महारेराने 19 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्याशिवाय नोंदणीक्रमांक दिला जात नाही. सुरूवातीच्या तुलनेत यात सुसूत्रता आलेली असली तरी प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी आवश्यक असलेले मंजुरीचे इमेल मिळण्यात काही प्रमाणात होणारा विलंब आणि प्रस्तावातील  त्रुटींची संबंधित विकासकाकडून पूर्तता होऊ न शकल्याने 5471 प्रकल्पांपैकी 4332 प्रकल्पांना नोंदणीक्रमांक मंजूर करण्यात आलेले आहेत. उर्वरित 1139 प्रकल्पांची छाननी सुरू आहे. संबंधित विकासकांनी त्रुटींचा पूर्तता केल्यानंतर त्यांना नोंदणीक्रमांक देण्यात येईल.

यात पुण्यातील 1431 प्रकल्पांपैकी 1172, ठाण्यातील 765 पैकी 597,  मुंबई उपनगरातील 655 पैकी 528,  रायगडच्या 546 पैकी 450, नागपूरच्या 404 पैकी 336 आणि नाशिकच्या 381 पैकी 310 प्रकल्पांना नोंदणीक्रमांक देण्यात  आलेले आहेत. कल्याण - डोंबिवली, वसई- विरार क्षेत्रातील  446 प्रकल्पांपैकी 332 प्रकल्पांना नोंदणीक्रमांक देण्यात आलेले आहेत. यात वसई- विरारच्या 178 पैकी 123 आणि कल्याण- डोंबिवलीच्या 268 पैकी 209 प्रकल्पांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय प्रकल्पांचा तपशील

मुंबई महाप्रदेश- एकूण 1976

मुंबई शहर 77

मुंबई उपनगर 528

ठाणे 597

रायगड 450

पालघर 223

रत्नागिरी 66

सिंधुदुर्ग 35

पश्चिम महाराष्ट्र - एकूण 1415

पुणे 1172

कोल्हापूर  85

सातारा 66

सांगली 53

सोलापूर  39

विदर्भ- एकूण 437

नागपूर  336

अमरावती 45

वर्धा  24

चंद्रपूर  12

अकोला 11

वाशिम   4

भंडारा 3

बुलडाणा ,गडचिरोली  प्रत्येकी 1

उत्तर महाराष्ट्र- एकूण 347

नाशिक  310

अहमदनगर  28

जळगाव  8

धुळे  1

मराठवाडा - एकूण 149

छ.संभाजीनगर  117

लातूर 16

नांदेड- 8

बीड 4

परभणी 2

जालना ,  धाराशिव प्रत्येकी 1

दादरा नगर हवेली एकूण 8

टॅग्स :महारेरा कायदा 2017