पश्चिम रेल्वेतून ध्वनिप्रदूषण हद्दपार, राजधानी, दुरांतोला आधुनिक ‘पॉवर कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 05:41 AM2017-10-23T05:41:07+5:302017-10-23T05:42:35+5:30

लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणाºयांसाठी सुखद बदल पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे. राजधानी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस यामधून प्रवास करणा-या प्रवाशांना स्थानकावर प्रवेश करताच, पॉवर कारमुळे कर्णकर्कश आवाज सहन करावा लागतो

Outbreak of sound contamination from Western Railway, Capital, Durantola Modern 'Power Car' | पश्चिम रेल्वेतून ध्वनिप्रदूषण हद्दपार, राजधानी, दुरांतोला आधुनिक ‘पॉवर कार’

पश्चिम रेल्वेतून ध्वनिप्रदूषण हद्दपार, राजधानी, दुरांतोला आधुनिक ‘पॉवर कार’

Next

मुंबई : लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणाºयांसाठी सुखद बदल पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे. राजधानी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस यामधून प्रवास करणा-या प्रवाशांना स्थानकावर प्रवेश करताच, पॉवर कारमुळे कर्णकर्कश आवाज सहन करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून पश्चिम रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित एक्स्प्रेसमधील पॉवर कारमध्ये बदल केला आहे. पॉवर कारमध्ये तांत्रिक बदल करीत एक्स्प्रेसच्या मागे न जोडता पुढे जोडल्यामुळे प्रवाशांना कर्णकर्कश आवाजापासून मुक्ती मिळाली आहे.
लांब पल्ल्यांच्या वातानुकूलित गाड्यांमध्ये संपूर्ण बोगी वातानुकूलित करण्यासाठी पॉवर कारचा वापर होतो. पॉवर कारला ‘जनरेटर कार’ असेही म्हटले जाते. दूरच्या प्रवासासाठी पॉवर बॅकअप आणि बोगी कायम वातानुकूलित ठेवणे केवळ इंजिनला शक्य नाही. परिणामी, लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये विशेषत: वातानुकूलित एक्स्प्रेसमध्ये पॉवर कार जोडले जातात. स्थानकावर एक्स्प्रेस उभी असताना प्री-कूलिंगसाठी पॉवर कार कार्यान्वित करण्यात येते. परिणामी, स्थानकात कर्णकर्कश आवाज निर्माण होतो. याबाबत प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. प्रवाशांच्या सोईसाठी पॉवर कारमध्ये योग्य ते तांत्रिक बदल करण्यात आले आहे. शिवाय एक्स्प्रेसच्या मागच्या बाजूला पॉवर कार न जोडता, एक्स्प्रेसच्या पुढील बाजूस पॉवर कार जोडण्यात आल्याने स्थानकातील प्रवाशांना कर्णकर्कश आवाज सहन करावा लागणार नाही.
पॉवर कारमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी योग्य ती परवानगी घेण्यात आली आहे. आधुनिक बदलांसह पॉवर कार एक्स्प्रेसच्या पुढे जोडण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना पॉवर कारच्या कर्कश आवाजाच्या जाचापासून मुक्ती मिळणार आहे. सद्यस्थितीत हे बदल आॅगस्ट क्रांती राजधानी, मुंबई-दिल्ली राजधानी, मुंबई सेंट्रल -अहमदाबाद दुरांतो, मुंबई सेंट्रल-इंदौर दुरांतो, मुंबई सेंट्रल-दिल्ली दुरांतो आणि शताब्दी एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहेत.
>पॉवर कारमुळे होणा-या आवाजाबाबत प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पॉवर कारमध्ये आवाज कमी करण्याच्या दृष्टीने योग्य ते तांत्रिक बदल करण्यात आले. त्याचबरोबर, हे पॉवर कार एक्स्प्रेसच्या मागे न जोडता, एक्स्प्रेसच्या पुढे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. पश्मिच रेल्वेवरील दोन राजधानी, तीन दुरांतो आणि शताब्दी एक्स्प्रेसमध्ये हे बदल करण्यात आले आहेत.
- मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे

Web Title: Outbreak of sound contamination from Western Railway, Capital, Durantola Modern 'Power Car'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.