मुंबईत साथीच्या आजारांत मोठ्या प्रमाणात घट, वर्षभरात १२ मृत्यूंची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:06 AM2021-01-04T04:06:54+5:302021-01-04T04:06:54+5:30
मुंबई : गेल्या चार वर्षांच्या तुलनेत २०२० मध्ये पावसाळी आजाराने मृत्यूंची संख्या घटल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. तर २०१९ मध्ये ...
मुंबई : गेल्या चार वर्षांच्या तुलनेत २०२० मध्ये पावसाळी आजाराने मृत्यूंची संख्या घटल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. तर २०१९ मध्ये मलेरियामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. २०२० या वर्षात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या पावसाळी आजाराने १२ जणांचा मृत्यू झाला.
कोरोनासह पालिका यंत्रणांनी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले आहेत. त्यामुळे साथीच्या आजारांचा संसर्गही कमी झाल्याचे दिसून आले. कोरोनाचा संसर्ग असतानाच मलेरिया, गॅस्ट्रो, हेपेटायसिस, डेंग्यू आदी साथीचे आजारही मुंबईकरांना झाले आहेत. २०२० मध्ये मलेरियाचे ४९४८ रुग्ण आढळून आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. लेप्टोच्या २४० रुग्णांपैकी ८ रुग्णांचा मृत्यू झाला. डेंग्यूच्या १२८ रुग्णांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये पावसाळी आजाराने एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
२०१६ मध्ये मलेरियाचे १२, २०१७ मध्ये ६,२०१८ मध्ये ३ तर २०२० मध्ये १ मृत्यू झाला. मात्र २०१९ मध्ये मलेरियाचे ४३५७ रुग्ण सापडले. त्या वर्षात एकाही रुग्णाची मलेरियामुळे मृत्यूची नोंद नसल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.
चौकट
वर्ष मलेरिया डेंग्यू हेपेटायटिस लेप्टो स्वाइन फ्लू एकूण
२०१६ १२ ७२ ९ ० ३०
२०१७ ६ १७ २ ७ १ ५०
२०१८ ३ ३१ ० ५ २०
२०१९ ० ३१ ० ५ २०
२०२० १ ३० ८ ० १२