मुंबईतील रुग्णवाढ येतेय नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:07 AM2021-06-09T04:07:57+5:302021-06-09T04:07:57+5:30

दिवसभरात ६७३ कोरोनाबाधितांची नोंद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाची दैनंदिन रुग्णवाढ मुंबईत हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिसते आहे. ...

Outbreaks appear to be under control in Mumbai | मुंबईतील रुग्णवाढ येतेय नियंत्रणात

मुंबईतील रुग्णवाढ येतेय नियंत्रणात

Next

दिवसभरात ६७३ कोरोनाबाधितांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाची दैनंदिन रुग्णवाढ मुंबईत हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिसते आहे. मंगळवारी मुंबईत ६७३ बाधितांची नोंद झाली, तर सात रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूची संख्याही आता कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. येथील रुग्णवाढीचे दैनंदिन सरासरी प्रमाण ०.१२ टक्का एवढे खाली आले आहे, तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ५४३ दिवसांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत मुंबईत सात लाख तीन हजार दोन रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सहा लाख ८० हजार नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तसेच १५ हजार ७३ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या १५ हजार ७०१ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या सात रुग्णांपैकी सहा रुग्णांना सहव्याधी होत्या. मृतांमध्ये पाच पुरुष, तर एका महिला रुग्णाचा समावेश होता. पाच मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर दोन रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दिवसभरात २६ हजार ९९२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ६४ लाख ८० हजार ४९१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९५ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: Outbreaks appear to be under control in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.