Join us

कालबाह्य सामग्री, उपकरणे भंगारात

By admin | Published: March 18, 2016 2:54 AM

पोलिसांच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेली पण कालबाह्य झालेली शस्त्रसामग्री व उपकरणे आता लवकरच भंगारात जाणार आहेत. शहर व उपनगरांतील सर्व पोलीस ठाण्यांतील उपलब्ध शस्त्रसामग्रीचा आढावा

- जमीर काझी,  मुंबईपोलिसांच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेली पण कालबाह्य झालेली शस्त्रसामग्री व उपकरणे आता लवकरच भंगारात जाणार आहेत. शहर व उपनगरांतील सर्व पोलीस ठाण्यांतील उपलब्ध शस्त्रसामग्रीचा आढावा घेतला जाणार आहे. सुरक्षा व संरक्षण विभागाला (प्रोटेक्शन व सिक्युरिटी) त्याबाबत पाहणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिले.मुंबई पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यांत अत्यंत जीर्ण व जुनाट बुलेटप्रूफ जॅकेट व अश्रुधुराच्या नळकांड्या वापरल्या जात आहेत. गुरुवारी त्याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘पोलिसांची सुरक्षा रामभरोसेच’ असे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली; तसेच पोलीस आयुक्त पडसलगीकर यांनी त्याबाबत सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांना तातडीने योग्य कार्यवाहीचे आदेश दिले. ‘लोकमत’ने त्याबाबतची वस्तुस्थिती चव्हाट्यावर आणल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे डोळे उघडले आहेत. शहर व उपनगरांत ९३ पोलीस ठाणी आहेत. त्या ठिकाणी असलेल्या बुलेटप्रूफ जॅकेट व अन्य साधनसामग्रीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल सादर करण्याची सूचना सुरक्षा व संरक्षण विभागाच्या अपर आयुक्तांना करण्यात आली. ‘आवश्यकतेनुसार नवी सामग्री देऊ’...आयुक्तालयांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांतील उपलब्ध बुलेटप्रूफ जॅकेट व अन्य शस्त्रांच्या कार्यक्षमतेबाबत सुरक्षा विभागाला तपासणी करण्याची सूचना केलेली आहे. निरुपयोगी व कालबाह्य साहित्य काढून त्यांना आवश्यकतेनुसार नवीन सामग्री दिली जाईल. - देवेन भारती, सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था